करण तोऱ्यात निघून गेला.
त्यानंतर, त्या रात्री मायाला बिलकुल झोप आली नाही.
करणचे सगळे विचार डोक्यातून काढून टाकण्यासाठी तिने थंड पाण्याचे शॉवर घेतले.
लॅपटॉप घेऊन ती बेडवर येऊन बसली.
तिच्या सहकाऱ्यांचे आणि क्लाएंट्सचे बरेच मेल्स आले होते.
ते सर्व चेक करून तिने त्यातल्या खूप महत्वाच्या काही मेल्सना रिप्लाय दिले.
कामासंदर्भात काही व्हॉट्सअँप मेसेजेस आले होते.
तेही तिने बघितले.
हे सर्व करे पर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते.
साधारण दोन तासांनी, पहाटे साडेचार वाजता तिची एका फॉरेन टीम सोबत ऑनलाईन मीट होती.
त्यामुळे तिने, आता झोपायचेच नाही असे ठरवले.
हे डील जर फायनल झाले तर मायाच्या कंपनीवर डॉलर्सची अक्षरशः बरसात होणार होती.
जागरण सुसह्य व्हावे यासाठी मायाने एक मोठ्या मगात कॉफी भरून घेतली आणि तिची फेवरेट वेबसिरीज लॅपटॉपवर ऑन केली.
एकामागून एक एपिसोड ती संपवत होती.
तिचे व्हॉट्सअँप वेबला कनेक्ट होते.
साधारण चार वाजता करणचा व्हॉट्सअँप मेसेज फ्लॅश झाला.आय एम सॉरी माया.
करणचे सॉरी वाचून मायाला बरे वाटले.
इट्स ओके एवढाच रिप्लाय तिने दिला.पहाटेची तिची फॉरेन कंपनी सोबतची मीट एकदम मस्त झाली.
त्या कंपनीने मायासोबत तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता.
लॅपटॉप चार्जिंगला लावून सकाळी सात वाजता माया थोड्या वेळासाठी झोपली.
नऊचा अलार्म झाल्यानंतर ती नाईलाजाने उठली.
पाचेक मिनिटात तिची कामवाली मावशी हजर झाली.ताई चेहरा किती कोमेजलाय तुमचा!
काल परत जागरण केले ना?
तुम्ही आयटीवाले ना!
फक्त काम, काम आणि काम.
तुम्हाला रात्र अन् दिवस यातला फरकच कळत नाही.
झाडू मारता मारता मावशीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.माया तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती.
मावशीला गप्प करण्यासाठी माया म्हणाली, चहा घेणार का मावशी तुम्ही?दोघींचा चहा पिऊन झाला तोपर्यंत स्वयंपाकीण आली.
नाश्ता आणि टिफीनचा मेनू तिला सांगून माया आंघोळीला निघून गेली.
तिची ऑफिसची तयारी होईपर्यंत त्या दोघींची सगळी कामे झाली होती.
नाश्ता आणि टिफीन टेबलवर ठेवून स्वयंपाकीण निघून गेली होती.
कपडे सुकत घालून नंतर कामवाली मावशीही निघून गेली.
जाताजाता, तब्येतीकडे लक्ष द्या असा काळजीवजा इशारा देऊन गेली.
YOU ARE READING
टॅटू
Fantasyमायाचे टॅटूचे वेड तिला कुठपर्यंत नेऊन पोहोचवते हे जाणून घेण्यासाठी माझी ही लघुकथा नक्की वाचा. सादर करत आहे. टॅटू..