Marathi/English Short Love Story With Old School & Fairy Tale Vibes!🤍
Please show your support by commenting, voting, and following... and don't be a Silent Reader.. At least do vote to let me know you're engaged!!
#1 in Maharashtra on 15-12-2024✨
"सांग ना ग आता तरी.. देशील ना माझी साथ "शेवटपर्यंत"?" तो तिचा हात त्याच्या काळजापाशी घट्ट धरून म्हणाला..
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कातरवेळी, समोर निळ्याशार समुद्रात सूर्य आपलं अस्तित्व झोकून देत असताना ते दोन वेडे जीव आयुष्याच्या उत्तरार्धात, हातात हात धरून, एकमेकांचा सहवास अनुभवत होते.
Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.
( Credits - Your लेखिका!😉 )
प्रेम सुद्धा किती विचित्र असतं ना.. आपण म्हणतो पहिलं प्रेम हेच खरं असतं, कितीही वर्ष उलटली तरीही मनाच्या एका कोपऱ्यात त्याचं अस्तित्व तग धरून लपलेलं असतंच.. आणि ते खरंही आहेच म्हणा.. पण,
प्रेम फक्त एकदाच होतं?
किंवा.. पहिल्या प्रेमापेक्षा दुसरं कुठलंच प्रेम आयुष्यभर "तितकंस" खास वाटत नाही?
माझ्या मते तरी प्रेम तेच असतं जे वय कुठलंही असो, परिस्थिती कोणतीही असो, ते प्रेम आपल्या फक्त सोबतच नाही, तर आपल्या चार पाऊलं पुढे चालून आपली साथ देतं!
नशिबाने त्यांच्यासोबत अनेक खेळ खेळले असले तरीही, आज आयुष्याच्या या अध्यायात पदार्पण करताना सुद्धा मनाच्या कोपऱ्यात त्यांनी एकमेकांना अगदी फुलाच्या नाजूक पाकळीसमान जपून ठेवलं होतं.. कदाचित त्यामुळे आपले निर्णय सुद्धा चुकू शकतात अशी हुरहूर लागून देवाने या दोन वेड्या जीवांना शेवटी एकत्र आणलंच!
आयुष्यापुढे हरलेल्या, तरीही एकमेकांच्या ओढीने घट्ट गुंतून राहिलेल्या या दोन जीवांचं असं डोळ्यांचं पारणं फेडणारं मिलन पाहून नभातले ते मुक्त जीव सुद्धा उल्हासाने त्यांच्या अवतीभोवती स्वैर करत होते.