Part - १

1.5K 9 2
                                    

माझं नाव अजित मी एका आय टी कंपनी मध्ये काम करतो, माझं नुकतंच ६ महिन्यापूर्वी लग्न पार पडलं, मी आणि माझी बायको निशा आम्ही दोघे फ्लॅट घेऊन राहतो.

माझी बायको निशा बद्दल सांगायचं झालं तर, दिसायला थोडी सावळी आहे, पण रूपाने मात्र देखणी.. घरातली सर्व कामे, जेवण पासून कपडे धुण्यापर्यंत सर्व कामं करते.

आम्हाला फ्लॅट घेऊन नुकताच १ महिना झाला.
एक दिवस निशा च्या आईची तब्येत बरी नव्हती..

निशा - अहो ऐका ना.. आईची तब्येत बरी नाही आहे.. मी आज वस्तीला जाऊन येऊ का..

मी - अगं हे काय विचारणं झालं का!! जा की..

निशा - अहो पण तुमचं जेवण..

मी - अगं एक दिवस खाईन बाहेरचं, मी पण आलो असतो पण माहिती आहे ना तुला.. वर्क फ्रॉम होम च असतंय..

निशा - मग मी कार घेऊन जाऊ का..

मी - कार घेऊन!! नीट जाशील ना..!!

निशा - हो अहो नका चिंता करू..

मी - नका चिंता करू काय!! भीती वाटते.. नीट चालव ठीक आहे..

निशा - हा.. थँक्यू...

असं म्हणत तिने मला गच्च मिठी मारली, आणि दोघांनी ही एक दीर्घ चुंबन देत, दोघं ही मिठीतून विलग झालो..

मी निशा ला खाल पर्यंत सोडायला गेलो..
आणि टाटा करून.. वर आलो..
वर येताना रेश्मा वहिनी समोर आल्या,
रेश्मा वहिनी बद्दल सांगायचं झालं तर गुबगुबीत अशी फिगर, दिसायला गोरी, तिने एक स्मित हास्य देत, केस काना मागे करत हाय!! केलं..

हे हे.. आताचं नाही बरं का..
जेव्हा पासून मी राहायला आलो, तेव्हा पासून ती अशीच लाजत हाय करते, थोडं माझ्याशी बोलायला बघते..

मी नॉर्मल बोलतो, पण निशा ला ते आवडत नाही कारण की ती मला नेहमी हाय करत असे, स्मित हास्य करत असे बघून तिने मला सोशल मीडिया वर रिक्वेस्ट ही पाठवल्या होत्या, मी तेव्हा त्या स्वीकारल्या ही होत्या, पण जेव्हा निशा ला समजलं तेव्हा तिनेच अनफ्रेंड केलं,
म्हणून तिने मला तिच्याशी न बोलायला सांगितले, आणि चार हात लांबच राहिला सांगितले..
निशा सांगत होती की, ती एकटीच असते, नवऱ्याला सोडून दिलं आहे तिने..


रेश्मा वहिनी जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें