मला काय वाटलं कुणाचं ठाऊक मी तिला बेसिन जवळचा टॉवेल दिला आणि हळूवार पणे तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो..
अहो तुम्ही रडू नका मी आहे ना..
असं म्हणताच ती अजून रडू लागली आणि तिने मला मिठीच मारली.. मी थोडा हैराण झालो..
इथून पुढे...मग वाटलं भावनेच्या भरात तिने मला मिठी मारली असेल..
मी मग तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवर माझे दोन्ही हात नेत मी, तिला शांत करत होतो..अहो शांत व्हा आता मी आहे ना.. लोकं पण काय सत्य आहे त्यावर विश्वास न ठेवता स्वतःच च खरं सांगतात..
तुम्ही शांत व्हा..
असं म्हणत तिला मी शांत करत होतो.
थोड्यावेळ आम्ही असेच एकमेकांच्या मिठीत होतो.मला ही काय वाटलं कुणाचं ठाऊक मी ही डोळे बंद करून बेधुंद होऊन तिला कन्सोल करत होतो.
आणि इतक्यात चहा उकळण्याचा आवाज आला तसे आम्ही एमेकांपासून वेगळे झालो..ती सॉरी म्हणाली आणि आता त्यात गॅस कमी करा आणि त्यात दूध टाका असं म्हणाली.
मी - अहो किती सोप्पी आहे..
तिने हा म्हणत होकारार्थी मान हलवली.
तिचं पूर्ण चेहरा पडला होता,
मीच चहा दोघांसाठी कप घेऊन भरला आणि तिच्या हातात दिलं.ती एकटीच पुढे जात सोफ्यावर जाऊन बसली, मी ही तिच्या मागे जात तिच्या शेजारी जाऊन बसलो..
तिचे अश्रू काही थांबत नव्हते.
मी तिच्या हातातला चहा चा कप घेतला,आणि तिचा एक हात हातात घेत तिला म्हणालो..
रेश्मा वहिनी मला आता खरं खरं सांगा नक्की काय झालं आहे..
तुमचा भूतकाळ मला जाणून घ्यायचं आहे..