मी - अगं त्यात वेगळं काय.. आजची रात्र कशी बशी काढुया उद्या सकाळी मी चावी वाला बघतो.. ठीक आहे?
रेश्मा - ठीक आहे..
असं म्हणत मी आणि रेश्मा आत आलो..
इथून पुढे...दोघेही पूर्ण ओलेचिंब झालो होतो, मी पहिले तिला सांगितलं की..
रेश्मा फ्रेश हो नाही तर सरळ अंघोळच कर, मी तुला निशा चे कपडे देतो, आज पूर्ती ते घाल ठीक आहे.
ती हा म्हणून बाथरुम मध्ये गेली..ओलाचिंब झालेलो मी, टॉवेल ने तात्पुरता केस अंग पुसत होतो.
काही वेळाने रेश्मा बाहेर आली..
आणि आता मी फ्रेश व्हायला आत गेलो..
मी ही काही वेळाने अंघोळ करून बाहेर आलो..रेश्मा अस्वस्थ चेहऱ्याने बोटांची जुळवजुळव करत बसली होती..
मला जरा वेगळं वाटलं, मी तिच्या शेजारी जात तिला विचारलं काय झालं रेश्मा..रेश्मा - काही नाही..
मी - अगं रेश्मा बोल ना काही झालं आहे का...
रेश्मा च्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या होत्या.
मी ही घाबरलो आणि म्हणालो
"काही झालं आहे का तुला!!!"
मला आताच्या आता सांग तुला शप्पथ आहे माझी..
जरा उंच आवाजात तिला म्हणालो..
तशी ती बोलायला लागली..रेश्मा - सॉरी, अजित जी.. मला माफ करा..
मी - सॉरी!! ते पण कष्याबद्दल..??
रेश्मा - जे काही माझ्या वरचा ताबा सुटला आज त्यावरून, पण खरं सांगते मी मुद्दामून नाही केलं, अहो ते नकळत घडून गेलं..
मी तिचा हात माझ्या हातात घेऊन म्हणलो..
मी समजू शकतो रेश्मा तुझ्या भावना.. गेले काही महिने तू कशी राहत असशिल, आणि हे काय स्वाभाविकच आहे..रेश्मा - पण अहो ते, पाऊसात भिजत असताना, ती जी फिलिंग आली व ते गडाडलं, त्या नंतर मला काही समजलंच नाही की मी काय करते..
मी तिच्या टॉवेल ने अश्रू पुसत म्हणालो..
इट्स ओके रेश्मा... काही नाही झालंय येवढं, मला ही काही नाही वाटलं, ठीक आहे आणि ते आता आधी रडायचं थांबव, नाही तर बघ हा!!
तशी तिने तिचं रडणं थांबवलं.