( The largest Chapter in this book to date!!! )
"सॉरी ना यार खरंच सॉरी पण ऐकून तरी घे एकदा!! मी खरंच आज वेळेतच येणार होतो, पण अगं पहाटे मी घराबाहेर पडलो ना तेव्हा अलीकडच्या बस स्टॉपवर एक मुलगी झोपलेली दिसली.. मला नवीनच वाटली ती मुंबईमध्ये म्हणून उठवलं आणि मग सकाळ होईपर्यंत तिच्या सोबतच होतो.. आपल्या मरीन ड्राइव्हला घेऊन गेलो तिला.. आता तुला नव्याने सांगायची गरज नाहीये मुंबई कितपत सुरक्षित आहे ते मुलींसाठी.. म्हणून तिच्यासोबत, तिला सकाळपर्यंत साथ देत होतो गं.. आणि तुला माहितीये, ती ना सुरवातीला जरा विचित्र आणि रुक्ष ( रुक्ष - Rude ) वाटली मला.. पण तशी छान आहे.. म्हणजे विचित्र बोलण्यापेक्षा ती गूढ वाटली मला.. आणि आम्ही थोड्याच वेळात मित्र सुद्धा झालो!! पण ना आई खरं सांगतो ती गेल्यापासून ना मला तिची खूप काळजी वाटतेय गं.. म्हणजे तशी सगळ्यांना पुरून उरेल अशीच आहे ती, पण तरीही.. ए पण तू का शांत आहेस?? अजून रागावली आहेस माझ्यावर?? सॉरी ना.." वेदिक त्याच्या आईसमोर लहान मुलांसारखा एका दमात सगळं बोलून मोकळा झाला.
"घोड्या!!! मला बोलू देशील तेव्हा बोलेन ना मी?? आणि मघापासून ओरडा खातोयस माझा एवढा तेव्हा तोंड उचकायला काय झालं होतं तुला?? आणि ती मुलगी.. तुझी नवीन मैत्रीण.. ठिक आहे?? सुरक्षितपणे घरी घेऊन गेलास ना तिला तू??" आई लांबूनच त्याला कळेल अशा भाषेत दरडावत म्हणाली.
"नाही ना.. म्हणजे तिला पत्ता माहित होता पण मला दे म्हणालो तेव्हा दिला नाही तिने.. हट्टी आहे ती खूप.. तसं मला पण काळजी वाटतेय तिची पण पुरून उरेल सगळ्यांना अशीच आहे ती!! पोहोचली असेल सुरक्षित तिच्या नव्या घरी. बरं, तुझं झालं असेल आशीर्वाद दे मला आता.. तू तर काय विसरूनच गेली आहेस मला.. लक्षात तरी आहे तुझ्या आज काय आहे?? बस फक्त ओरडतेस मला.. आठवतंय तुला तरी शेवटचं कधी प्रेमाने बोलली आहेस माझ्याशी??" वेदिक डोळ्यातलं पाणी लपवत गोड तक्रार करत म्हणाला.
"वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वेद!! मला माहितीये तुझ्या या बडबड्या, खट्याळ आणि हसतमुख चेहऱ्यामागे खरं काय दडलंय ते.. तरी सुद्धा संपूर्ण जगासमोर तू लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवत वावरतोस.. मला माफ कर बाळा!! मी नाही साथ देऊ शकले तुझी." आई
YOU ARE READING
साथ तुझी! / Together, Our Paths Entwine! ✨
RomanceMarathi/English Short Love Story With Old School & Fairy Tale Vibes!🤍 Please show your support by commenting, voting, and following... and don't be a Silent Reader.. At least do vote to let me know you're engaged!! #1 in Maharashtra on 15-12-2024✨