महेश सकाळी आठ वाजता आला, तो सुधाला भेटून परस्पर तिकडूनच परत जाणार होता. पण काल रात्रीपासून माझे मन थाऱ्यावर नव्हते. कोणत्या गावाला जायचं आहे अजून बाबांनी सांगितलं नव्हतं, मी सुद्धा नाही विचारलं. अकरा वाजेपर्यंत मामा आले. ते आणि आणखी गावातील दोघे नी बाबा सोबत आम्ही निघालॊ. मामांनी कार आणली होती, त्यांच्या कारनेच आम्ही जायला निघालो.
"मामा कोणत्या गावाला जायचं आहे?" मी मामांना विचारलं, कारण गाडी सावरगावच्या रस्ताने निघाली होती. सावरगावसमोर आणखी दोन-तीन गावं आहेत, बहुतेक तिकडेच कुठेतरी जायचे असणार असे माझ्या मनाला वाटले.
---
"आरे... चाल न गड्या लय घाई झाली दिसतीया पोरगी पाहाची ?" आपल्या टिपिकल गावाकडच्या भाषेत ते बोलले. सावरगाव आले आणि गाडी रात्री मी आलो त्याच घरापुढे थांबली,
'च्यायला हिच्या बहिणीसाठी वगैरे तर नाही ना...' मनात विचार आला.
होऊ शकते तिला मोठी बहीण असेल तिच्यासाठी.... तसे असेल तर काय करायचे ?... नकार देऊन तिला मागणी घालायची? हो .... हो ... हो ... तसंच करायचं. पहिल्यांदा एक मुलगी पसंत पडली आणि तिच्या घरी येऊन तिच्या बहिणीसोबत लग्न करण्यापेक्षा तिच्यासोबत केलं तर काय होणार? असे नानाविध विचार मनात चालले होते.
"आरे.. चाल न गड्या आतमंदी भानावर आलो आणि आत शिरलो.
भायीरच उभा राहून पायशील का पोरगी" त्यांच्या शब्दांनी मी
घर मस्त होतं ऐसपैस पोहे - चहाचा कार्यक्रम झाला, शेवटी मामांनी मुलीला बाहेर आणायला सांगितलं. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं... कोण येणार आतमधून... ती कि तिची बहीण... कि आणखी कोणीतरी? पहिल्या इंटरव्हिवला पण मी इतका नर्व्हस झालो नव्हतो जितका आज होतो. माझं सगळं लक्ष आतून येणाऱ्या दाराकडे होतं.
तितक्यात ती आली, लाल साडीत...