भाग 1

835 6 0
                                    

सनई चौघड्याचे सूर निनादत होते.. संपूर्ण हॉल माणसांनी भरुन गेला होता.. अमोघ अवघ्या काही वेळातच स्टेजवर येणार होता.. अनन्या स्टेजकडे डोळे लावून बसली होती.. आजूबाजूला सर्वत्र घाई गडबड सुरू असताना अनन्या भूतकाळात गेली.. अमोघ सोबतची पहिली भेट तिला आजही अगदी व्यवस्थित आठवत होती..

१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते.. भेटले म्हणण्यापेक्षा एकमेकांची नजराजनर झाली होती.. अमोघनं सिनियर कॉलेजला अॅडमिशन घेतलं होतं.. वर्ग शोधता शोधता उशीर झाल्यामुळे पहिल्याच दिवशी उशीर झाला होता.. अनन्या अकरावी, बारावीलादेखील त्याच कॉलेजला असल्यानं तिला संपूर्ण कॉलेज ओळखीचं होतं.. अनन्या पहिल्या बेंचवरच बसली होती.. तितक्यात 'मे आय कमिंग...' असं विचारत अमोघ वर्गात आला.. काहीसा गोंधळलेला अमोघचा चेहरा अनन्याच्या कायम लक्षात राहिला.. पुढच्या बेंचवर जागा नसल्याने अमोघ मागे जाऊन बसला.. जाताना अमोघ आणि अनन्याची नजरानजर झाली..

पुढे एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असल्याने अमोघ आणि अनन्याची ओळख झाली.. अनन्या दिसायला सुंदर.. सडपातळ बांधा.. मध्यम उंची.. जीन्स टॉप घालणारी.. फारशी फॅशन नाही.. मात्र चारचौघीत उठून दिसणारी.. मेक अप न करताही अतिशय सुंदर दिसणारी.. अमोघही तसा साधा.. फारशी फॅशन नाही.. आपण कॉलेजमध्ये अभ्यास करायला येतो.. कोणाला इम्प्रेस करायला नाही, या विचारांचा अमोघ कायम जीन्स आणि शर्टमध्ये कॉलेजमध्ये यायचा.. मात्र एकदा अमोघने प्रिंट असलेला टी शर्ट घातला होता आणि तेव्हापासूनच अमोघ आणि अनन्या एकमेकांशी बोलायला लागले..

'ए हा टी-शर्ट छान आहे.. तू जनरली नाही घालत ना टी-शर्ट?' अनघा म्हणाली.. यातून ती अमोघला ऑब्जर्व्ह करते हे कळून येत होतं.. मात्र ते अमोघच्या लक्षात आलं नाही..

'फारसे नाहीयत टी-शर्ट.. हे टी-शर्ट मित्रांनी प्रिंट केलंय.. त्यावरचं वाक्यदेखील त्यांचंच आहे.. म्हणून घातलंय..' अमोघचं उत्तर ऐकताच अनन्या त्याच्या टी-शर्टवरचं वाक्य वाचू लागली..

Kamu telah mencapai bab terakhir yang dipublikasikan.

⏰ Terakhir diperbarui: Feb 09, 2018 ⏰

Tambahkan cerita ini ke Perpustakaan untuk mendapatkan notifikasi saat ada bab baru!

अमोघ आणी अनन्याTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang