ओढ

61 1 1
                                    

आहे मला तुझी आस, ओढ ही फार खास.
काय सांगू नि कोणास बोलू, किती हा तुझा ध्यास?

चाहूल तुझ्या येण्याने, मन हे  आतुरले
ओल्या - सुक्या आठवणीने, डोळे मात्र पाणावले

पाहून वाट त्या  मिठीची , भावनांच्या  उचंबळल्या लाटा
गहिवरून मन माझे, कल्पल्या तुझ्या प्रकृतीच्या छटा

नाही कळले कधी, किती जीव हा गुंतला!!
नाही थांबवत आता,  जीव कासावीस झाला

स्मरणात ठेवशील मला ,  भेटशील एकदा
आठवण राहील मला, त्या भेटची सर्वदा!!!

Hai finito le parti pubblicate.

⏰ Ultimo aggiornamento: Oct 14, 2018 ⏰

Aggiungi questa storia alla tua Biblioteca per ricevere una notifica quando verrà pubblicata la prossima parte!

प्रयत्न Dove le storie prendono vita. Scoprilo ora