मानसी ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. वर्ण गोरा, सरळ नाक , गुलाबी ओठ, हरणी सारखे डॊळे, सरळ बांधा, आणि बोलणं ही अदागी गोड.
कोणीही सहज प्रेमात पडेल तिच्या, अशी होती अगदी मानसी.
लहानपणापासून च मानसी अगदी लाडात वाढलेली. लहानपणापासून समंजस, सोजवळ, जरा हट्टी, पण वेळ पडली तर दोन हात करायला मागे पुढे न पाहणारी. अशी ही मानसी......
शाळेत दर वर्षी तिचा पहिला च क्रमांक येत असे. अभ्य्सात हुशार, वर्क्तृत अगदी निपुण, खेळात चपळ. प्रत्येक गोष्टीत हुशार अशी हुशार अशी मानसी.
सध्या ती नुकतीच दहावी उत्तीर्ण होऊन कॉलेजला जाणार असती.
************************************
(मानसीच्या नजरेतून )
अरे देवा!!! "आज एकतर कॉलेजचा पहिला दिवस आणि मला उठायला उशीरच झाला. लवकर उरकलं नाही तर पहिल्याच दिवशी शिक्षा होईल." असं बोलून मानसी आवरून तिच्या खोली बाहेर येऊन नास्ता करायला बसली.
" आई लवकर दे ग. मला आदीच उशीर झालंय. वेळेत नाही गेले तर काय बोलतील सर. लवकर दे ग. नाही तर मी जाते तशीच. "
"आले ग मनू गाई नक्को करू तू. लवकर उठायचं ना मग जरा. " आई स्वयंपाकघरातून ओरडली.
मानसी नास्ता करून निघाली, तोच आई ने जोरात आवाज दिला, "आग मनू तू डबा विसरली तुझा. वेडी आहे ही मुलगी."
मानसी स्वतःची चूक कबूल करुंन स्मितहास्य देत घरातून निघाली.
"आदीच एक तर उशीर झालंय, आणि बस पण वेळेवर येईना झालीय, आज कोणाचं तोंड पाहिलं सकाळ सकाळी काय माहित " असं ती स्वतःशी बोलू लागली. ..
कशी बासी मानसी एकदाची कॉलेजला पोहचली.
************************************
हा माझा पहिलाच प्रयन्त असल्यामुळे एवढच लिहू शकले. मानसीचा आता कॉलेज चा पहिला दिवस कसा येतोय हे आता आपण पुढच्या भागात पाहू
तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर नक्की वोट आणि कॉमेंट करा
धन्यवाद..........