दुसऱ्या दिवशी मानसीची कॉलेजला जायची तयारी झाली. ती कॉलेजला जायला निघाली. रस्त्यात ती वेदचाच विचार करत होती. "रात्रीच त्याच भयाण रूप पाहून मी तर हादरलेच होते. ते रक्तने भरलेले हात. हात छत्री ऐवजी लोखंडी साळी, डोळ्यातून अश्रू ऐवजी रक्ताचे थेंब. सायंकाळी पाच सहाच्या सुमारास देखील अंधार. भयानक ती शांतता. फक्त रातकड्यची किर sssssss.. हे सगळे पाहून माझ्या पायाखालची जमीनच हलली. आणि जशी आई ने हाक मारली तस सगळं डोळ्यसमोरच नष्ट झाले ., जाणू मी काही पहिलेच नाही.... डोळ्यासमोर अंधार नाही, रक्त नाही, अक्षरशः वेद ही नाही. हा अचानक कुठे गेला हे पाहण्यासाठी मी जाणार तेवढ्यात आई ने हाक मारली. नाईलाजाने मला घरी जावं लागलं. " मला घडल्या प्रकारचे तसें एवढे भय वाटले नाही कारण हे माझ्या साठी काही नवीन नव्हते....." विचारत मी चालत असताना तेवढ्यात मागून तिला हाक ऐकू आली, 'ये मानसी थांब ". मागे पहिलं तर वेद होता. जवळ येऊन धापा टाकत बोलला, "अग किती हाका मारायच्या तुला, कोणाच्या विचारत तू चालली होतीस तू. " आता ह्यला काय सांगू कोणच्या विचारत होते ते, ती स्वतःशीच पुटपुटली. दोघे ही तिथून कॉलेजला निघाले. पण मानसीला त्याच्या बरोबर जाताना जारा भितीचं वाटत होती. पूर्ण रस्ता भर ती शांतच होती. बडबड फक्त वेद च करत होता. मानसी फक्त एकत होती. त्याच्या बोलण्यातुन तिला त्याच्या स्वभावाचा अंदाज येत होता. तो असं काहीच करणार नाही. मला आपला नेहमीप्रमाणे भास झाला असेल. असं तिला वाटल.
ते हा सगळा विचार डोक्यतून कडून टाकायचे ठरवले. कारण मला हे माहीत होत कि हे माझ्या साठी नवीन नाहीय. तेवढ्यात माझ्या कानात कर्रर्रर्र कसा आवाज आला. हा आवाज वेदनेच काढला होता. तेव्हा मी भानावर आले. पुन्हा तो बोलला अग मानसी कोठे हरवली तू. सारखी तू तुझ्या विचारात हरवत असतेस. "एवढ्या वेळात आपण कॉलेजला पोहचलो असतो. चाल पटकन, " असं बोलून वेद चालत होता . आम्ही बस स्टॉपवर आलो. पुन्हा तोच काल सारखा पाऊस सुरु झाला. कालच्यासारखी मी पुह्ना छत्री घरी विसरले. आता मात्र माझ्यावर हसण्यासाठी त्याला नवीन चान्स मिळाला होता.
तशी आमची दोन दिवसात बरीच ओळख झाली होती. जाणू काही आम्ही एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो कि काय असं मला वाटू लागलं. बोलता बोलता आम्ही कॉलेजला येऊन पोहचलो.
तस ही अजून शिक्षक येयला पाच दहा मिनिट बाकी होती. म्हूणन आम्ही मुली गप्पा मारत बसलो. एका दिवसात तशी चांगलीच गट्टी जमली होती. आमचा एक ग्रुपच बनला होता असं म्हणायला काही हरकत नाही. मी, ऋचा, वेद, राहुल, निधी, असे आम्ही पाच जण. लॉन्ग ब्रेक ची घन्टा वाजली. तसें आम्ही सगळ्याजणांनी कॅन्टीन कडे धाव घेतली. "आता कोणकोण काय काय खाणार? " वेद"सगळयांना सँडविच सांग " राहुल म्हणाला.
सगळ्यांनी मान हलून आपले उत्तर दिले.
सँडविच खाता खाता खूप गप्पा ही मारल्या. तरी ही वेळ हा उरला. हौशी वेद ने पुन्हा एक नवीन प्लॅन बनवला इसक्रीम खायला जायचा. मी आणि ऋचा नाहीच म्हणालो. तरी पण वेद ने माझा हात पकडून मला खेचत कॅन्टीनमधून बाहेर आणले.
" त्याचा स्पर्श मला ओळखीचा वाटला. माहित नाही का???? पण हा स्पर्श मला आधी अनेक वेळा झालंय असं जाणवू लागलं मला. " असे का होतंय मला माझं मलाच कळेनास झालं होत. माझं विचारचक्र चालू व्हायच्या आत वेदनेच ते थांबवलं, आणि आम्ही इसक्रीम खायला गेलो. इसक्रीम खाताना सुद्धा वेदला मस्ती सुचत होती. एवढं कस कोण मस्ती करू शकत, हाच मी विचार करत राहिले...
असाच सगळा दिवस मस्ती करण्यात जात होता आमचा. एका मागून एक दिवस चालेले होते. तसे मी आणि वेद एकमेकांच्या जवळ येत होतो. आमची मैत्री अजून घट्ट होऊ लागली होती. हळू हळू आमचं भेटणं वाढू लागलं. बोलण तर विचारूच नका, अर्धा दिवस तर आमचं बोलणंच चालत असे. हळूहळू मी माझ्या आजरातुन बाहेर येत होती." मला वयाच्या पाचव्या वर्षांपासून हा आजार झालंय. शरीरात होणाऱ्या केमिकलच्या बदलामुळे असे भास होतात मला . म्हूणन मला ते वेद चे रूप पाहून जास्तच भय वाटल.
मला जे नेहमी भास होतात त्यापेक्षा हा झालेला भास खूपच वेगळा होता."
************************************
क्रमश: