अदभूत शिवराय- व्यवहारी शिवराय

165 2 0
                                    

व्यवहारी शिवराय..
 

१.. 
     
       ज्याला जी भाषा उमगते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे, हि शिवाजी महाराजांची रीत. त्यामुळेच तर अफजल खानासारख्या कुटील कारस्थानी सरदारास शिवरायांनी त्याच्या पध्दतीने नेस्तनाबूत केले. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यासारख्या मातब्बर शत्रुंविरोधात लढताना शिवाजी महाराजांना अजूनही काही परकीय सत्तांना तोंड द्यावे लागत.
       पंधराव्या शतकाच्या सुरवातीला व्यापार आणि साम्राज्यवादाच्या मोहातून अनेक पाश्चिमात्य देश जगभरात भ्रमण करत होते. वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाश्याने इ.स. १४९८ साली आफ्रिकेला वळसा घालून या भारतभूमीवर पाय ठेवला, आणि पाश्चिमात्य देशांना सोन्याची खाणच गवसली. इंग्रज, डच, फेंच, पोर्तुगीज अशा अनेक देशांच्या व्यापारी कंपन्यांनी व्यापारासाठी भारताचा मार्ग धरला. शिवाजी महाराजांचे राज्य स्थापन होईपर्यंत या व्यापारी कंपन्यांनी हिंदुस्थानात बऱ्यापैकी आपले बस्तान बसविले होते. व्यापारवाढीसाठी राज्यकर्त्यांना विविध प्रलोभने देणे, व्यापारी बंदराच्या नावाखाली प्रदेश बळकाविणे. असे अनेक उद्योग या कंपनीवाल्यांचे चालू असत. मुख्यत: किनारी भागात यांच्या व्यापारी गढ्या आणि सुसज्ज समुद्री आरमार उभे असत. डच, फ्रेंच, पोर्तुगीजांपेक्षा इंग्रजांना हिंदुस्तानवर अधिपत्य गाजवायची जरा जास्तच घाई होती. पण मराठी मुलुखात शिवरायांचा दरारा असा होता कि, त्यांच्या वाटेला हे कंपनीवाले जात नसत. शिवरायांशी शक्यतो व्यापारी संबंध असावेत किंवा चांगले संबंध असावेत असाच या कंपनीवाल्यांचा प्रयत्न असत.
      शिवाजी महाराज पन्हाळ्याला सिद्धीच्या वेढ्यात अडकले होते . सिद्धी जोहर ने वेढा इतका जागता ठेवला होता कि, वेढा फोडून महाराजांचे बाहेर पडणे, जवळपास अशक्य वाटत होते. त्यामुळे सिद्धीच्या वेढ्यात महाराज पकडले जाणार किंवा मारले जाणार, असाच सर्वदूर कयास झाला होता. याचाच फायदा घेतला टोपीकर इंग्रजांनी. एक दिवस सिद्धीच्या छावणीतून गडावर तोफा डागण्यात येत होत्या. गडाच्या तटातून महाराजांनी पहिले तर हे इस्ट इंडिया कंपनीवाले इंग्रज त्यांचा युनियन जॅक लावून थेट शिवरायांना आव्हान देत होते. काही काळानंतर महाराज सिद्धीच्या वेढ्यातून मोठ्या शिताफीने निसटून गेले. पण त्यांच्या मनात या इंग्रजांबद्दल कमालीची चीड होती. इंग्रजांच्या या कृत्याबद्दल महाराजांनी त्यांना खरमरीत शब्दात जाब विचारला. त्यावर इंग्रजांनी त्यांना उत्तर दिले कि, ‘आम्ही व्यापारी लोक आहोत आम्हाला राजकारणाशी काही देणघेण नाही.’ इंग्रजांचे हे उत्तर मिळाल्यावर शिवरायांनी इंग्रजांची राजापूरची वखार पहार लावून खणून काढली. पण इंग्रजांचे उत्तर महाराजांच्या मनात घर करून राहिले होते. ‘ आम्ही व्यापारी आहोत. आमच राजकारणाशी काही देनघेण नाही.’ त्यामुळे या व्यापारी इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे असे शिवाजी महाराजांनी ठरविले होते.

अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवराय Where stories live. Discover now