अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवराय 3

52 1 0
                                    

३..
नारायण शेवण्यांनी गडावर घडलेली सर्व तपशील गव्हर्नर गॅरॉन रोन्जीअरला सांगितला. नारायणपंतांचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर  गॅरॉन रोन्जीअर म्हणाला.
“शिवाजी आणि त्याची माणसे महालबाड आहेत. आपल्याला अलिबागच्या वाखरीच्या वराता देतील. आणि त्यांच्या तिथल्या प्रजेला सांगतील कि, पुढील आदेश येईपर्यंत अलिबागला हे जिन्नस टाकू नका. आयुष्यभर आपल्याला त्या वराता घेऊन बसावे लागले.
“साहेब मग काय करावे?” नारायणपंत.
“आमच्या हेरांनी बातमी आणली आहे कि, शिवाजी गडावर परत आला आहे. तुम्ही परत गडावर जा. आणि थेट त्याच्याशी बोलूनच आपले देणे मागून घ्या. आणि हो तुमच्या एकट्याच्या हाती काही लागेल अस मला वाटत नाही. तुमच्यासोबत अत्यंत हुशार असा आमचा इंग्रज माणूस आम्ही पाठवीत आहोत. तो नक्कीच यातून मार्ग काढेल.” – गॅरॉन रोन्जीअर
      एव्हड बोलून  गॅरॉनने नारायण शेणव्यांसोबत फ्रान्सिस मॉलीवेअर नावाचा इंग्रजी अधिकारी रायगडावर पाठवला. दोघेही पुन्हा चार पाच दिवस प्रवास करून पाचाडला पोहोचले. पाचाडला आल्यावर त्यांनी महाराजांच्या भेटीची वेळ मागितली. पण महाराज नुकतेच स्वारीवरून परत आले होते. त्यामुळे अनेक कामे बाकी होती. मग पुन्हा या पाहुण्यांना भेटीसाठी वाट पहावी लागली. साधारण महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांना गडावरून बोलावणे आले. दोघेही गडावर पोहोचले आणि गडावर पोहोचल्यावर त्यांनी महाराजांना मुजरा केला.
“या नारायणपंत बोला.” महाराज.
“ महाराज आम्ही इंग्रजांशी आपल्या झालेल्या व्यवहारासंबंधी काही अर्ज करण्यासाठी आपणासमोर उपस्थित झालो आहोत.” - नारायणपंत
“मोरोपंतानी आम्हास त्याची कल्पना दिली आहे. परंतु यावर मोरोपंतानी आपणाला सुचविलेला उपाय अगदीच योग्य होता असे आम्हास वाटते.” - महाराज  
“नक्कीच महाराज परंतु मोरोपंताच्या आदेशाप्रमाणे आम्ही गोऱ्यासाहेबाकडे जिन्नस घेण्याची परवानगी मागितली असता. त्यांनी रोख रक्कम देण्याची विनंती केली आहे.” – नारायणपंत
“नारायणपंत इंग्रजाना या पूर्वीही आम्ही सांगितले आहे आणि आपणाला मोरोपंतानी सांगितले आहे कि, रायगडावर रोख रक्कम नाही.” – महाराज.
“मग महाराज यातून आपणच उपाय सुचवावा हि विनंती.” – नारायणपंत
“निश्चितच यातून मार्ग काढावा लागेल नारायणपंत! स्वराज्याचा राजा म्हणून आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबध जपायचेत म्हणून आम्ही आपणाला एक उत्तम उपाय सुचवितो. आम्ही इंग्रजांना जेव्हढ्या रकमेचे देणे आहे. तेव्हढ्या रकमेच्या ऐवजी आम्ही आपणास त्याच किमतीचे सोने किंवा चांदी देण्याची व्यवस्था करतो. – महाराज.
“पण महाराज रोख रकमेच्या बदल्यात सोने किंवा चांदी घेण्याचा अधिकार माझा नाही. त्यासाठी आम्हाला गोऱ्यासाहेबाची परवानगी घ्यावी लागेल.” नारायणपंत
“मग तुम्ही तशी परवानगी घेऊन यावे. आम्हालाही हा व्यवहार लवकरात लवकर निकाली काढायचा आहे. – महाराज

अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवराय Where stories live. Discover now