वारीतील श्रीहरी 1

53 2 0
                                    

वारी

आषाढी जवळ आली तसे सखाला वेध लागले विठ्ठल भेटीचे, सखाराम जाधव पुण्याजवळ दौंड च्या नजीकच्या छोट्या गावाचा रहिवासी. माउलींच्या पालाखीसंगे पंढरपूरला जायच आणि पुन्हा माउलीना आळंदीपर्यत सोबत करायची. हा दरवर्षीचा वारीचा नियम सखाने आजवर कधीच चुकवला नाही. गळ्यात माळ, हातात टाळ आणि वारकरी साम्प्रदायाशी नाळ कधी आणि केव्हा जोडली गेली, हे साखला आता आठवत हि नाही. जेव्हापासून कळतंय तेव्हापासून आई वडील, आजीआजोबा यांच्या समवेत सखा पायी वारी करतोच आहे.

गेल्या वर्षी बायको गेली. तेव्हापासून सखा थोडा खचला होता आणि शरीराने थकलाही होता. 'अहो थकेल नाही तर काय. वयाची ८५ वर्षे सहज पार झाली असतील. आता जन्माची नोंद कुठेच नाही, त्यामुळे नक्की वय सांगणे कठीण, पण कमीतकमी ८५ नक्की, तोंडात दाताचा पत्ता राहिला नाही आता. शरीरावर सुरकुत्यांची नुसती जाळीच, वयानुसार शरीरही साथ देत नव्हत आता'. छोटमोठ ही आजारपण आता सतत चालू असायचं. पण अंगात बळ असेपर्यत वारी चुकवायची नाही. असा सखाचा निर्धार त्यात, आई बापानंतर घराण्याची वारकरी सांप्रदायाची प्रथा सखाने न चुकता जपली होती. पण सखानंतर सखाची मुल ती परंपरा जपतील असा सखाला वाटत नव्हत. सखाला तीन मुल होती, पांडुरंगाच्या कृपेने सगळे शिकले, कामधंद्याला लागले आणि आपले आपले संसार थाटले. आणि आपल्या विश्वात छान रमले. तिघेही शहरात राहायचे. नोकरी करत होते. त्यामुळे त्याचं गावाला येण जाणही कमीच असायाच. सखाचीही त्यांच्या बद्दल काही तक्रार नसायची. पण त्यांच्या नोकऱ्यामुळे त्यांच्याच्यान हि वारकरी सांप्रदायाची प्रथा पाळली जाणार नाही. याची सल मात्र सतत त्यांच्या मनाला टोचत रहायची. शेवटी जोवर आपण आहोत तोवर आपण विठ्ठलभक्ती करताच रहायची हे त्याने ठरवला होत. म्हणूनच जशी जशी वारी जवळ येत होती. तसा सखाचा उत्साह वाढीला लागला. मुलांनी अनेक वेळा सांगून पाहिला " बाबा यंदा राहु द्या नाही झेपायची वारी तुम्हाला" पण सदाने मात्र हट्ट सोडला नाही. त्याच्या मनात विश्वास होता. 'विठठ्लाच्या मनात असेल तर तो स्वत: मला पंढरपूर पर्यत घेवून जाईल.'

पालखी प्रस्थानाचा दिवस आला. सखा एक दिवस आधीच आळंदीत दाखल झाला. मनोभावे माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ज्ञानाबा- तुकारामांच्या जयघोषात ती म्हतारी पावलं स्वतःहूनच नाचायला लागली. माउलींची पालखी निघाली. मंदिराचा कळस हलला. माउलीनि विठ्ठल भेटीसाठी प्रस्थान केले. सखाही त्याच्या दिंडीतील सहकार्यांसह निघाला. उत्साह खूप होता. पण शरीर कुठेतरी थकल्याची जाणीव करून देत होते. सखा हळूहळू मागे पडला. जमेल तेव्हड चालायचं थकल कि थांबायचं थोडा आराम करायचा आणि पुन्हा चालायला लागायच. अस करत करत सखा पुण्यापर्यंत पोहोचला. पुण्यात मुक्काम लेकाच्या घरी. एक दिवसाचा आराम करून दुसर्या दिवशी सगळ्यात मोठा पल्ला गाठायचा होता. दुसर्या दिवशी पहाटेच सखा पालखी सोबत निघाला. हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल भेटीच ओढ यांच काही वेगळच वातावरण तयार झाल होत. जागोजागी होणार पालखीच स्वागत आणि वारकर्यांच स्वागत सगळा अद्भुत अनुभव.

क्रमशः

वारीतील श्रीहरी Where stories live. Discover now