तरुणाने अंगावरच जॅकेट काढून सखाच्या अंगावर चढवल आणि सखाला पाठीवर घेवुन चालु लागला.
" पोरा कुठला रे तु? तुझ नाव काय?"
" बाबा माझ नाव श्रीहरी, मी पंढरपुरचा."
" अर वा! विठ्ठलाच्या गावचाच हायस कि! दरवर्षी वारी करतो का?"
" हो दरवर्षी मी पालखीला पंढरपुरी न्यायला येतो. रस्त्यात जाता येता तुमच्या सारख्या थकल्या भागल्या, अडल्या नडल्या पण खऱ्या विठ्ठल भक्ताना पंढरपूरला पोहोचायला मदत करतो"
" अर वा माऊली मोठ पुण्याच काम करतो कि तु".
" बाबा आता तुमच्यासारखे वारकरी ८५/८५ वर्ष न चुकता विठठलाच्या दर्शनाला येत असतील. तर तुमच्या हाकेला - अडचणीला धावायलाच हव ना? आणि जस तुम्ही विठ्ठलावर प्रेम करता तसाच हरीही तुमच्यावर प्रेम करतोच कि?"
सखा ला भारी कौतुक वाटल. बोलण्याच्या नादान कधी सखाच्या दिंडीची वस्ती आली कळलच नाही.
" बाबा आलो बघा तुमच्या वस्तीला."
" लय लय आभारी हाय पोरा तुझा. विठ्ठल तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करल. बघ!"
" बाबा तुमच्या सारखे पांडुरंग भक्त मनात कोणतीही अपेक्षा न बाळगता, एव्हड्या लांब पंढरपूरला चालत येता. ताटकळत दर्शन बारीत थांबता. तुमच माझ्यावरच प्रेम असच राहू द्या."
एव्हड बोलून श्रीहरी गर्दीत मिसळून नाहीसा झाला. त्याच्या शेवटच्या वाक्याने गोंधळलेला सखा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्याची थकलेली नजर विलक्षण भक्तीभावाने त्या गर्दीत श्रीहरिला शोधात होती.
अशीच असते वारी, असेच असतात वारकरी आणि असाच असतो श्रीहरी तो कधी कुठल्या रुपात तुम्हाला वारीत भेटेल ते त्यालाच माहीत....
जय श्रीहरी...
समाप्त..
KAMU SEDANG MEMBACA
वारीतील श्रीहरी
Spiritualमहाराष्ट्र संतांची भूमी, या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा मोठा इतिहास. याच वारकऱयांचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वारी. विठ्ठल भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरला चालत जात असतात. या वारीत श्रीहरी म्हणजेच विठ्ठलही चालतो अ...