हडपसर गेल, वडकी गेली पालखी घाटात आली. सखा शक्यतो गर्दी सोबत राहण्याचा प्रयत्न करत होता. पण सखा आता मागे पडला होता. त्याला घाटात पोहोचता पोहोचता अंधार पडला. कसाबसा निम्मा घाट चढल्यावर सखा पुर्ण थकला. आणि एका बाजुला बसला. हळुहळू गर्दी कमी झाली. वारकरी आपल्या आपल्या ठिकाणावर पोहोचायला लागले. पण सखा मात्र अजुन घाटातच होता. त्याचे पाऊलच उचलत नव्हत. त्याने मनातल्या मनात पांडुरंगाचा धावा सुरु केला. त्याला माहीती होत एव्हडा पल्ला गाठला कि पुढे आपण कसे ही जाऊ. एक एक पाऊल उचलायच त्याचा प्रयत्न चालु होता. मागुन येणाऱ्या गाडीवाले त्याला विचारत होते. " बाबा बसा गाडीत सोडतो सासवडला." 'पण वारी पायीच करायची मग गाडीत कस बसायच' अस मनातल्या म्हणत तो सगळ्याना नकार देत होता.ऱात्रीचे १० वाजुन गेले असतील. सखा अजुनही घाटातच होता. वर पावसाची भुरभुर सुरु होती. सखाचा म्हतार शरीर गारठायला लागल होत. कावरा बावरा होवुन सखा एक ठिकाणी टेकला. काही वेळ असाच गेला. रात्र वाढत होती. अचानक एक तरुण सखा समोर येउन उभा राहिला. शहरी पेहराव केलेला चांगला सहा फुट उंच आडदांड गडी होता तो.
" बाबा कुठे वारीला का? पालखी पोहचली सासवडला आणि तुम्ही अजुन इकडेच?
त्यान सखाला विचारल. त्यावर सखाने त्याला त्याची अवस्था सागितली. "माहीतीये मला" तरुण म्हणाला. पण ते सखा ला निटस ऐकु गेल नाही.
" तुम्ही चला माझ्या बरोबर मी पण पालखी सोबतच आहे. तुम्हाला तुमच्या दिंडीपर्यत सोडतो."
" आता याच्या पुढ चालता यील अस न्हाई वाटत मला" सखा कसाबसा बोलला.
" तुम्ही काळजी नका करु. मी तुम्हाला खाद्यावर घेतो. तसाही तुमचा भार तो किती."
" अर नको पोरा. तु हो म्होर मी येतो जमल तस."
" बाबा नका फार विचार करू, तुम्ही मघाशी म्हणाला होतात ना! वारी पायीच करायची, सासवड पर्यंत गेलात तर पुढे वाट सोप्पी, मग वारी तुमच्या पायाने केली काय माझ्या पायाने केली काय सारखच, तुम्ही बसा माझ्या खांद्यावर मी दमलोच तर तुम्हाला सांगेल."
शेवटी निरुपाय होऊन सखा त्याच्या खांद्यावर बसायला तयार झाला.
क्रमशः
BẠN ĐANG ĐỌC
वारीतील श्रीहरी
Tâm linhमहाराष्ट्र संतांची भूमी, या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा मोठा इतिहास. याच वारकऱयांचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वारी. विठ्ठल भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरला चालत जात असतात. या वारीत श्रीहरी म्हणजेच विठ्ठलही चालतो अ...