प्रणव
"प्रणव ना? नूसता मूगगिळ्या आहे एक नंबरचा. मूर्खाला कोणाकडे काही मागायचे म्हटले की जीवावर येते. मग ती वस्तू स्वतःची असली तरी तो असाच करतो. ईतका नेभळट स्वभाव चांगला आहे का? असे तर त्याला कोणीपण गूंडाळेल. कसं व्हायचं त्याचं देव जाणे?"
माझी स्वभाव विशेषता आई कोणालातरी ऐकवत होती. मी प्रणव. मी पंचविशीचा झालो होतो. छानपैकी पॅकेज असलेला एलिजीबल बॅचलर. लग्नांमधे माझेपण प्रेझेंटेशन होण्यासाठी गेले सहा महीने माझी आई मला घेऊन जात होती. तीला थोडा भाव खायचा असायचा. मूलाची आई म्हणजे कितीही आधूनिक गप्पा मारल्या आपण तरी मूठभर मांस जास्तच असते. ते त्यांच्या बोलण्यातून जाणवते. असो.
तर माझ्याबद्दल ईच्छूक लोकांकडून विचारणा केली जायची. तेव्हा आई माझ्या नोकरीबद्दल, कमाईबद्दल बडबड करून भाव खायची. माझ्या स्वभावाबद्दल मात्र तीचे मत फारसे अनूकूल नव्हते. तीला माझा भिडस्त स्वभाव आवडायचा नाही. तीला माहीत होते की मी वाद घालण्यात किंवा माझेच रेटण्यात ईतका पटाईत नव्हतो. म्हणून तीला माझ्यासाठी तीच्या म्हणण्यानूसार बोलघेवडी चाणाक्ष धाडसी आणि थोडी भांडखोर असली तरी चालेल तशी मूलगी हवी होती. माझी काही म्हणजे काहीच मागणी नव्हती. मला सूंदर मूलगी हवी. हे स्वतःला सांगायला पण खूप दिवस लागले.
तर असा माझा स्वभाव. पण आईने माझे म्हणने काहीच नसते हे समजून घेऊन माझ्यासाठी वधू संशोधन चालू केले होते. आठ नऊ महीन्यांनी तीला यश आले. "मेघा" माझ्यासाठी पत्नी म्हणून निवडली गेली. तीचे स्थळ एका मावशीच्या ओळखीतून आले होते. माझी ती मावशी म्हणजे प्रतीआईच होती. त्यामूळे तीला आईचे म्हणने नीटपणे कळले आणि तीने मेघाचे स्थळ सूचवले. मला पाहील्यावर मेघाच्या घरचेही खूश झाले. मी दिसायला तसा गोरा आणि हँडसम होतो. तब्येत , अंगकाठी सडपातळ होती. मूळातच भिडस्त स्वभावाचा असल्यामूळे शांतता चेहर्यावरच नांदत होती.
मेघा मात्र ह्या ऊलट होती. तीचा बडबड करण्याचा स्वभाव तीला शांत बसू देत नव्हता. मी मात्र पहील्या भेटीत बोलायचं सोडून तीच्या प्रश्नांना हो किंवा नाही आणि तीच्या म्हणन्याला दूजोरा देणे याशिवाय काहीही केले नाही. पण बोलक्या डोळ्यांची सूबक बांध्याची मेघा कोणालाही प्रेमात पाडील अशी होती. तीचा गोरा रंग छोटीशी जीवणी. खालचा ओठ थोडा मोठा. गोरे छोटे गूबगूबीत हात. खळखळून हसण्याची अदा मला मोहून गेली. मी तीच्या सौंदर्याचा, वागण्याचा आणि निरागस हसण्याचा दिवाणा झालो.