प्रतारणा - Part 1

10.8K 24 1
                                    

"तू तुझ्या आईवडिलांचा मिंधा बनून राहा आयुष्यभर. तुला दुसरे येते काय रे? माझ्यासाठी तू कधीही स्टॅन्ड घेऊ शकत नाहीस." मनाली रुपेशला म्हणत होती. एका बाजूला ती तिच्या सॅक मध्ये काही कपडे भरत होती.

"असे नाहीये मनू. कंडिशन समजून घे." रुपेश तिला समजावत होता.

"काय समजावून घे रे? ती तुझी आई, तिला जरा तरी कळते का सून म्हणजे काय आहे ते? माणुसकीसुद्धा नाही तिला. मी काय तुझ्या आईला माझ्यासाठी काही करा म्हणते का? एवढीच अपेक्षा ठेवते कि कामावरून आल्यावर मला थोडीतरी मदत मिळावी. तुला काही सांगितले तर तुला काही जमत नाही असे सांगून तुला पदराखाली घ्यायला बघते तुझी आई. आणि तू पण लपतोस. जरा कोणी माझ्याकडचे येणार म्हटले कि तुझी आई लगेच आजारी पडते. मात्र तिला तिच्याकडचे येणार म्हटल्यावर लगेच कसे हे करू ते करू असे डोहाळे लागतात. " मनाली चिडून म्हणाली.

"मनाली!" रुपेश तिच्यावर ओरडला.

"हा ओरडना माझ्यावर, एवढा ताव तुला दाखवता येतो तर कधीतरी माझ्या बाजूने तुझ्या घरच्यांवर दाखव जरा." मनाली म्हणाली.

"तुला म्हणायचंय काय दर वेळी भांडत बसू का त्यांच्याशी." रुपेश म्हणाला.

"भांडत? अरे तू काय भांडणार. तूझ्यासारखा भेकड तूच. बायकोवर आवाज चढव फक्त. तुला साधी मी उशिरा येणार आहे अशी कल्पना तरी देता येते का तुझ्या आईला. ती बाई मी कितीपण उशिरा आले तरी माझीच वाट पाहात बसते. हि येईल आणि करेल. मला काही जीव आहे कि नाही. " मनाली खूपच वैतागली होती.

"गेले 3 वर्षे मी तुला सांगत आहे. तुझ्या आई वडिलांशी शांतपणे बोल आपल्या प्रॉब्लेम बद्दल. एका शब्दाने तू संभाषण कधी सुरु केले नाहीस. तुझी आई मला म्हणतीये. नासक्या झाडाला फळे लागत नाहीत. तुमचा लेक नासका आहे माहित नाहीये तिला. मी माझ्या संस्कारांमुळे इतके दिवस गप्प बसले पण आता सहन नाही होत. तिला काय माहित मी नासकी आहे कि तिच्या नासक्या पोटी जन्माला आलेला तू नासका आहेसा नासका. मनालीने सगळे गरळ एका दमात रुपेश समोर ओकले.

प्रतारणाDonde viven las historias. Descúbrelo ahora