द्विधा - Part 1

9.6K 12 1
                                    



"ह्म्म्म.... नो... प्लिज... स्टॉप इट... इट्स रॉंग.. प्लिज.. बबलू...नो..."

"ममा ममा.. काय झालं..? ममा..."

"हं..?!?!.. कुठे काय?.. काही नाही.. झोप झोप."

माधुरी तिच्या मुलाला झोपवत म्हणाली.

गेले काही दिवस तिचे असे होत होते. ते सुरु व्हायला प्रसंग घडला तो मागच्या महिन्यामध्येच.

****

"हॅलो माधुरी."

"हा आई बोल."

"अगं काहीं नाही. तुझ्या वहिनीचे ओटीभरण करायचे आहे. सातवा लागला ना तिला आता."

"हो. केव्हा करायचे चालले आहे?"

"पुढच्या गुरुवारी. नानासाहेबांना फोन करणार आहेत हे. तुला आधी कळवावेसे वाटले म्हणून कॉल केला."

"ठीके येऊ आम्ही."

"तसं नाही ग तू २ दिवस आधी ये. मी दादाला पाठवते तुला घ्यायला."

"अच्छा."

"त्यासाठी हे सांगतील नानासाहेबांना."

"बरं."

"ठेऊ मग?"

"हो आई ठेव."

माधुरीचे माहेरी जाणे फिक्स झाले. तिला जरा छान वाटले.
"नेक्स्ट वीक एन्जॉय." ती मनात म्हणाली.

संध्याकाळी तिचा नवरा नानासाहेब घरी आला. त्याला चहा ठेवत असताना. तो किचन मध्ये आला आणि माधुरीला म्हणाला.
"तुझ्या पप्पांचा कॉल आला होता."

"हम्म"

"पुढच्या आठवड्यात घ्यायला येतायत तुला सोमवारी. तुझ्या वहिनीचा ओटीभरणाचा कार्यक्रम आहे." तो म्हणाला.

"होय आईने सांगितले मला." माधुरी चहाच्या पातेल्यातच बघत म्हणाली.

"एकच गोष्ट सांगून ठेवतो. मी कॉल केला आणि तू उचलला नाही असे एकदा जरी झाले ना, तर लगेच तिथे येऊन घरी आणणार तुला." नानासाहेब तिला खवचट सुरात म्हणाला.

माधुरीने उत्तरादाखल फक्त त्रासिक चेहरा केला आणि त्याच्याकडे पहिले. तो शर्टची बटणे काढत बेडरूम कडे निघून गेला.

द्विधाWhere stories live. Discover now