द्विधा -Part 3

6.4K 21 5
                                    

बेडरूममध्ये तिला जे काही ऐकू आले त्यातून तिला भिती तर जाम वाटत होती पण नीटसा घडामोडींचा काही बोध झाला नाही. तिला बाहेर डोकावणे गरजेचे वाटले. तीने हळूच बेडरूमचे दार ऊघडले तर समोर अस्ताव्यस्त नानासाहेब धापा टाकत पडला होता. बबलू त्याच्या समोर कमरेवर हात ठेऊन ऊभा होता. माधूरीने मागून बबलूला पाहीले तेव्हा तिला अवलोकन झाले कि बबलू शारिरीक दृष्ट्या केवढा मजबूत आहे. त्याची ऊंची, रूंद खांदे, जमान्याची पर्वा न करता मनस्वी वागणे याची तीला क्षणात भूल पडली. त्याचे व्यक्तीमत्व आणि त्याची तिच्यावर असलेली ऊत्कट लालसा, ह्यावर ती सध्यातरी भाळली होती. इतक्या वर्षांनी त्याला असे नीट पाहताना त्याच्यामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाचे तिला आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटत होते. तिला स्वतःबद्दल आता थोडा अभिमान देखील वाटला. आपल्या सौंदर्याने अजूनही हा इतका घायाळ झाला आहे.

"माझ्या घरात येऊन मला मारतो. तूला दाखवतोच" असे म्हणत नानासाहेब ऊठू लागला तसा बबलूने त्याच्या पायाच्या घोट्यावर आपला पाय ठेवत रोवला. त्याचा एक हात छरून एकाच हातानेच धूणं पिळल्यासारखा मूरगळला.

"ओय ओय.. सोड.. आगं आय आय .. सोड ए.." नानासाहेब ओरडत होता.

"नरड्यातून आवाज निघालाना तूझ्या, तर एका हिसक्यात हात ढिल्ला करीन मास्तूरड्या." बबलूने दम दिला.

तसा मास्तर तोंडातल्या तोंडात कण्हायला लागला.
"हम्म. गप राहायच." त्याने त्याचा हात तसाच धरून ठेवला आणि पायावरचा पाय काढला.

"ऊठ चल. मूतला कि काय चड्डीत? तूझ्या आयचं फालकं तूझ्या." नानासाहेबाने बबलूच्या धमकीने खरेच पँट ओली केली होती. त्याने मागे वळून बघितले तर बेडरूमच्या दारात माधूरी ऊभी होती.

"बघ. तूझा नवरा. शेमन्याची लायकी आहे का तूला बायको म्हणून जवळ ठेवायची." त्याने त्याचा हात सोडला आणि त्याच्या मानेला दोन्ही हातांनी धरुन ऊचलले.

"भाडखाव. ईथला PSI माझा मित्र आहे. त्याच्याकडनं सगळं कळालय मला. तूझ्या नावाची कंप्लेंट करायला माधूरीला तिथं जायला लागलं होतं. पैशासाठी जाळून मारायला निघाला होता तू तीला? जबाब फिरवावा म्हणून आणि दबाव पण टाकलास तिच्यावर तू. कूत्रीच्या तूला आज चांगला धडा शिकवायला ईथं आणलाय मी. माझ्या मित्रानेच फोन करून सांगितलं तूला कि तूझ्या घरात कोणी परपूरुष घूसलाय म्हणून. आलाच लगेच. बायकोवर विश्वास नाहीना तूझा. तू मर्द नाहीयेस. कारण असतास तर स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवला असतास. ज्याला स्वतःच्या मर्दानगीवर विश्वास असतो ना त्याची बायको कोणाला वश होत नाही."

द्विधाWhere stories live. Discover now