श्वेता वहिनी भाग १

20.1K 31 3
                                    

माझी ओळख.

मी मयांक. वय ३०. तसा मी शिक्षणाने मेकॅनिकल एंजिनीअर आहे. पण माझे जास्त डोके शेअर मार्केटींगमधे आणि ट्रेडिंग मधे जास्त चालते, रोज रोज मार्केटचा अभ्यास करून मी चांगलाच गाढा अभ्यासक झालो. निफ्टीच्या स्क्रिप्ट्स डाउनलोड करून शेअर्सचा अभ्यास करत नंतर हलक्या हलक्या गुंतवणुकीतून मोठ्या गुंतवणुकीत आलो आणि शेअरमार्केट रुपी महासागरामध्ये स्वतःसुद्धा एक बरा मोठा मासा बनलो. नोकरी कमीपणाची वाटू लागली, कारण माझे वरिष्ठ वर्षात कमवत होते ते मी महिन्यात गाठत होतो. दिली सोडून.

आई-वडील साध्या विचारांचे मध्यमवर्गीय मानसिकतेचे होते. त्यांना काही ते रुचले नाही. आधीच वडिलांचे आणि माझे कधीच पटले नव्हते तेव्हा मी पहिल्यापासूनच स्वतःला सवय लावली आहे की मनाला जे पटते ते निर्णय घ्यायला मागे पुढे पाहायचे नाही. त्यांना माझी हि वृत्तीही आवडत नसे. मग मी त्यांना सांगितले कि मला तुमच्यासोबत नाही राहता येणार. माझी एक लग्न झालेली धाकटी बहीणही होती. ती एकाच शहरात असल्यामुळे ती त्यांची काळजी घेऊ शकत होती. तिला कळवून मग एकांगी निर्णय घेऊन मी बाहेर पडलो. पैसे खुप होते. तात्पुरता एक फ्लॅट रेन्टवर मिळवला आणि राहायला गेलो. पण मला तसे नको होते. मी चांगले राहणीमान असण्यासाठी सतत आग्रही होतो. उगाच मला कोणाचे बंधन नको होते. इथे हे करू नका तिथे ते करू नका. त्यामुळे मी स्वतंत्र घर शोधत होतो. एका एजंट कडून मला साध्या लोकॅलिटीमध्ये एक दहा वर्ष जुने रो हाऊस दाखवण्यात आले. पसंत पडले. एकरकमी पैसे मोजून घेऊन टाकले. पुढच्या एका महिन्यात मला हवे तसे फर्निचर करून घेऊन नंतर रंग देऊन घर ताब्यात घेतले. आजूबाजूला फार काही लॅव्हिश वस्ती नव्हती. पण मध्यमवर्गीय आणि साधी माणसेच असावीत असे मला प्रथमदर्शी निरक्षणात दिसले. मला त्याच्याशी फार काही कर्तव्य नव्हते. मला माझी स्वतःची जागा मिळाली होती. परिपूर्ण वाटत होते.

माझे घर पार्किंग प्लस दोन मजल्यांचे होते. पार्किंगमध्ये सुद्धा एक १०-१२ ची खोली आणि अटॅच टॉयलेट बाथरूम होते. सर्व्हंट रूम म्हणून. मला कोणालाही राहायला जागा द्यायची नव्हती. तेव्हा मी तिथे माझ्यासाठी जिम बनवली. वरती हॉल, किचन आणि त्याच्यावर २ बेडरूम नंतर टेरेस. मला घरूनच काम करायचं होतं. म्हणून एका बेडरूमला स्टडी कम ऑफिस बनवले. एक मोठा हाय कॉन्फीगर्ड वर्कस्टेशन विथ ट्वीन एलईडी डिस्प्ले घेतला. माझे रुटीन सुरु झाले. सकाळी सहावाजता उठून बाहेर रनिंगला जायचो. आल्यावर माझ्या पर्सनल जिममध्ये एक्झरसाईझ, अंघोळ. मग नाश्ता, माझ्या पुरते कुकिंग. आणि ९ ला मी शेअर मार्केटच्या साईट्स ओपन करून बसायचो. रोजचे सट्टे लावायचो. नफा कामवायचो. १ वाजता लंच घ्यायचो. नंतर कमावलेल्या पैशाची समरी घ्यायची. २ वाजता रिकामा व्हायचो. ४ वाजेपर्यंत मस्त झोप काढायची. संध्याकाळी ६ वाजता माझी एसयूव्ही घेऊन बाहेर पडायचो. आमच्या शहरामध्ये असलेल्या काही पब्ज पैकी एखाद्या पबमधे जायचो.

शेजार पाजारWhere stories live. Discover now