टाळेबंदी

865 6 0
                                    


२०२० चा मार्च महिना होता. मंगेश, अभिजित, सुमित तिघेही पुण्यावरून अविनाशकडे मुंबईला आले होते, २ आठवड्याच्या सुट्टीवर, तिथून मग गोव्याला जायचा प्लॅन होता. आणि नेमकी मार्च एंडिंगला टाळेबंदी झाली. कोवीडमुळे त्यांचा प्लॅन फिस्कटला, त्यांचा मूड ऑफ झाला. टाळेबंदी घोषीत करून एक आठवडा झाला. हे चौघे मित्र अविनाशच्या वन रूम किचन मध्ये राहत होते. चौघेही एवढे वैतागले होते की ते एकमेकांना शिव्या आणि दोष देत होते. तुझ्यामुळे अडकलो, तरी मी सांगत होतो, मला वाटलंच होतं वगैरे वगैरे. त्यात विरंगुळा म्हणून चौघे पत्ते खेळू लागले, अगदी दिवस रात्र. अशाच एका कंटाळवाण्या दुपारी चौघे पत्ते खेळत होते, तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते.

टिंग टॉंग

सगळे एकमेकांकडे बघतात आणि लगेच आपल्या गेम मध्ये मग्न असल्याचं भासवतात.

टिंग टॉंग

या वेळी तर बेल वाजलीच नाही, आपल्याला काही ऐकूच नाही आलं असे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर !

अविनाशची रूम आहे, अविनाशला पुढाकार घेणं भाग होत.

अविनाश: ए मंग्या, जाना, बघ ना कोण आहे.

मंग्या: ए नाय हा, मी नाय जाणार, मी बसलोय आता, मला लय कंटाळा आलाय.

अविनाश : मग मी पण बसलोयच ना, ए सुमित, तूजाना !

सुमित काहीच प्रतिक्रिया देत नाही .

अविनाश : ए सुमित, अरे ए, काय बहिरा झालास काय ? अरे ए, आई** तुझ्याशी बोलतोय मी. कसला मा*** आहे हा भो****. आभ्या प्लिज जाना!

अभिजीत : मी एकटा नाय उठणार, कोणीतरी चला माझासोबत.

अविनाश: भो**** फक्त दरवाज्यापर्यंत जाऊन बघायचंय कोण आहे, त्यात कशाला कोण हवाय तुला आईघाल्या?

अभिजीत: मी एकटा उठणार नाही पूर्ण विराम. मी तर म्हणतो जाउदेना, वाजूदेत घंटी, जो कोणी असेल तो वाजवून वाजवून जाईल परत .

अविनाश : आईघाले आहेत सगळे.

सुमित: ज्याची रूम त्याने जावे!

टाळेबंदीTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang