🌸 लागला छंद तुझा 🌸

138 1 2
                                    

तू कोवळी कळी गुलाबी
सये मधुर तुझा मकरंद...
मी भ्रमर तुझा तृषार्त
हूंगण्याचा गं मला छंद...!!

तू अवखळ लाट उसळती
सये मोहक तुझा उन्माद...
मी दगडगोटा तव पात्रातील
भिजण्यात गं मला आनंद...!!

तू केशर सांज नभीची
सये उधळण तुझी मनोहारी...
मी चित्रकार तुझा दिवाणा
हुबेहूब करतो गं चित्रकारी...!!

तू नाजूकशी पुष्पलव्हाळी
सये परिमल तुझा सुगंधी...
मी समीर तुझ्या भोवतीचा
गंधाळण्याची दे गं मला संधी... !!

तू चमचम चांदणी रात्रीची
सये मधाळ तुझा प्रकाश...
मी प्रणयातुर गं चंद्र तुझा
मिलनखेळाने रंगवू आकाश...!!

तू लाघवी प्रिया गं माझी
सये बुडालो तुझ्यात आकंठ...
मी प्रेमी तुझ्या प्रितीचा
प्रेमानं दाटला गं आज कंठ..!!

~आश्लेषा

🌸 लागला छंद तुझा 🌸Donde viven las historias. Descúbrelo ahora