फकीर कोण? (भाग १)

401 1 0
                                    


सन १८९९ डिसेंबर ३१ आज पूर्ण शहरात थर्टी फस्ट नाईट सेलिब्रेशन सुरू होते. अत्यंत आनंदाची रात्र होती सर्व जग साजरा करत होते. मिस्टर फर्नांडीस नावाच्या एका व्यापाऱ्याने त्याच्या फार्म हाऊस मध्ये एक सेलिब्रेशन पार्टी ठेवली होती. मिस्टर फर्नांडिस हा हिऱ्यांचा व्यापारी असल्यामुळे त्याच्या जवळ चिक्कळ पैसा होता. त्याने ही पार्टी साहजिक आपली श्रीमंती दाखवण्या साठी दिली होती.
सर्व आपापल्या गुंगी मध्ये होत्यात आणि सर्व खुश देखील होत्यात. मिस्टर फर्नांडिस हा आपला हिऱ्यांचा साठा हा फार्म हाऊस मध्ये ठेवत असत. सर्व मस्ती मध्ये हाेत्यात आणि तेवढ्यात एक नोकर मोठं मोठ्यानं ओरडत येतो.
चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली ...... श्वास घेत तो सांगू लागला "मालक हिऱ्यांचा साठा असल्याली चेंबर रिकामी झाली आहे" हे ऐकुन फर्नांडिस लागो लाग चेंबर कडे पळाला.
रिकामी चेंबर पाहून फर्नांडिस बेशुद्ध पडला.त्याची गाडी आली आणि लगोलग गाडी हॉस्पिटल मध्ये रवाना झाली.
पुढच्या दिवशी पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. पार्टी मध्ये जेवढी लोकं होत्यात त्यांना चौकशी साठी बोलावण्यात आले. सर्वांची चौकशी झाली आणि त्यांना शहर न सोडण्याची ताकीद दिली.
पोलिस पुरावा शोधण्यात मग्न झाले होते. तेवढ्यात एक खबर येती की फर्नांडिस च्या एका नोकराचा खून झाला आहे. पोलिस फार्म हाऊसवर गेलेत. त्या नोकराला पाहून सगळे चकित झालेत. कारण त्याचा खून कोणत्याही हत्याराने नव्हता केला व नाही विषाने. हे पाहून पोलिसांनी स्पेशल डॉक्टरांची टीम बोलावून घेतली. मृतदेह लॅब मध्ये रवाना करण्यात आला. मृतदेहावर संशोधन करण्यासाठी डॉक्टरांनी सुरुवात केली.दोन दिवसांनी त्याच प्रकारे अजून दोन नोकारांचा खून झाला.
फर्नांडिस ला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्याने लगोलग पोलिसांकडे धाव घेतली. ही केस एसीपी स्टीव स्मिथ याच्या कडे होती. स्टीव स्मिथ हा विनोदी आणि बावळट ऑफिसर होता. फर्नांडिस हा पोलिस स्टेशन मध्ये पोहचला.

फकीरWhere stories live. Discover now