कहाणी खूप शतका पूर्वी ची आहे जेव्हा देवाने विश्वाची निर्मिती करण्यासाठी काही लिविंग क्रिचर्स तयार केलेत. त्या मध्ये काही असे क्रिचर्स होते त्यांना मनुष्य सारखे देह आणि पाटीवर पंख असायचे. त्यांना अँजेल(angel) असे म्हणत होते. त्या मधलाच एक अँजेल होता तो देवाचा प्रिय होता. दिसायला सर्वांना मागे सोडेल असा देखणा होता. ल्यूसिफर(Lucifer) त्याचे नाव. ल्यूसिफर हा अतिशय हुशार आणि सुरेख होता. आणि तो देवाचा प्रिय असल्यामुळे त्याच्या मनात अहंकार वाडू लागला. त्याने काही अँजेलना आपल्या बाजूला करून देवाविरुद्ध कारस्थान रचले. देवाला जेव्हा याच्या कारस्थाना बद्दल कळाले तेव्हा देवाने त्याला युद्धा मध्ये मात करून नर्का मध्ये पाठवले....
सन १९०० जानेवारी ३
आह..आ....आ..आ हे काय चालू आहे इथे हे रक्त, चाकू, कोण आहेस तू... ती तरुणी धावण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात फकीर तिला पकडतो आणि खुर्ची ला बांधतो.
फर्नांडिस तिथे येतो आणि काय चाललय ते पाहतो.
फर्नांडिस: हे काय चालले आहे माझ्या घरी.....
फकीर: ही कोण आहे
तरुणी काठक आवाजात बोलते. मी नताशा...
फर्नांडिस: तूच आहेस ना ती खाणेत बडबडत करत आली होती.
फकीर: खाणेत.....
फर्नांडिस: हिऱ्याची खाण.
नताशा: बडबड नाही करत मी काळ आलाय तुला किती वेळा सांगितले मी.
फर्नांडिस: कोणता काळा आहे तो माझ्या मागे आलाय.
नताशा: काळा नाही काळ.
फकीर: तुला काय माहित काळ आलाय या बद्दल.
नताशा: मला माहित आहे.
फर्नांडिस: मी पोलिस बोलवतो.
फकीर: थांबा... ही आज पासून माझी सहकारी आहे.
फर्नाडीस: नाही.
फकीर: टर्म आणि कंडिशन वाचा.
फर्नांडिस: याचा काय संबंध.
फकीर: कंडीशन 13 वाचा.
फर्नांडिस वाचतो आणि गप बाहेर निघून जातो.
फकीर नताशा ला सोडतो आणि तिच्या कडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. नताशा त्याला इग्नोर करून जात होती तेवढ्यात फकीर बोलतो.
फकीर: तुम्ही आत्ताचं वाळू मधून गाजर खाऊन आलात.
नताशा थांबते आणि त्याचा कडे येते
नताशा: तुला कोड कसा माहित.
फकीर: कारण मीच तो बनवला आहे.
नताशा आश्चर्यचकीत होऊन पाहते.
नताशा: सॉरी सर मी तुम्हाला ओळखले नाही.
फकीर: असुदे... आता आपल्या दोघांना सोबत काम करायचे आहे.
नताशा: दोघे नाही तिघे.
फकीर: अजून कोण आहे.
मागून एक आवाज येतो. हॅलो मी आहे बघा इथे.
मागे एक तरुण असतो रंग गोरा,केस हलकेसे तांबडे, आणि एक डोक्यावर गोल टोपी असते पेहराव साधा होता.
फकीर: मागे आहेस तर पुढे ये आणि तुझे नाव सांग.
तो तरुण आपली ओळख करून देतो हॅलो मी वेध.
फकीर: हे काय वेड लागल्या सारखे नाव आहे.
वेध: तुम्ही कोण..
फकीर: मी फकीर
वेध गालात हसू लागला
(वेध कडे एक मस्त पैकी कला होती ताकत होती. की त्याला माहित होते की जे आता चालले आहे ते सर्व एका कथेत आहे आणि सर्व व्यक्ती हे पात्र आहेत.त्याला कोनही रोकु शकत नाही म्हणून तो कधी कधी तुमच्या सोबत बोलेल.)
फकीर: ऑफीस मध्ये चला.
सर्व unknown sky मध्ये जातात.
Unknown sky
फकीर: तर सांगा तुम्हाला काळा बद्धल काय माहित आहे.
नताशा: मी दोन महिण्या पूर्वी जॉईन झाले. तेव्हा एका केस बद्धल चौकशी करत असताना हा माझ्या कडे आला. आणि त्याने मला काळा बद्धल सांगितले. आणि मी मग लगेच त्या खानेत गेले तिथे हिऱ्याची खोदनी सुरू होते. मी त्यांना लाख सांगितले पण त्यांनी माझे ऐकून घेतले नाही.म्हणून आज हा दिवस बघायला लागतोय.
फकीर: वेध तुला काय माहित आहे या बद्धल.
(ओह...ओ....ओहहहहहह मला परत एकदा सांगायला भेटणार. तुम्ही पण लक्ष द्या. हा हा तुम्हीच वाचत आहात ना तुम्ही. मी आता मध्ये मध्ये येणार तुमच्याशी बोलायला. आता तुम्ही म्हणत आसाल कथे मध्ये पण पात्र आहेत त्यांच्याशी का हा बोलत नाही. तर मी तुम्हाला सांगतो. ती सर्व पात्र आहेत लेखक जसा लिहितो तसे ते वागतात. पण मी तसा नाही तुम्ही तर वाचक आहात. तुमच्याशी पण बोललं पाहिजे ना.. ओके मी जातो परत येणार मी. जातो मी नाही तर फकीर ओरडेल. काय नाव आहे याच हा फकीर..)
फकीर: वेध वेध.. कोणाशी बोलत आहेस काळा बद्धल सांग.
वेध: सॉरी.. तर काळ आलाय. हे मला जसे कळाले तसे मी नताशा ला गाटले. आणि पुढे काय झाले ते आता तुम्ही ऐकले आहे.
नताशा: काळा बद्धल सांग....
वेध: हो हो.... तर काळ म्हणजे एक असे शतक की जे आपल्या सर्वांना गिळून जाईल म्हणजे काळ. काळा ची सुरुवात ही केव्हाच झाली होती याच्या आधी एकदाच काळ आला होता. तेव्हा त्याने पूर्ण डाय्नोसोर्स नष्ट झाले होते.
फकीर: म्हणजे नेमके काय होते.
वेध: ह्म्म्म. नेमके म्हणजे जेव्हा देवाने पुर्थ्वी तयार केली तेव्हा नर्काचा एक दरवाजा पृथ्वी वर ठेवला. तोच दरवाजा फर्नांडिस च्या खाणीत होता जेव्हा तिथले हिरे हलवण्यात आले तेव्हा तो दरवाजा उगडला गेला होता.
फकीर: म्हणजे.
वेध: म्हणजे मेन्तिक्योर येणार.
फकीर: मेन्तिक्योर कोण.
वेध: एक भयंकर राक्षस. जेव्हा देवाने ल्यूसिफर ला नर्खात सोडले तेव्हा त्याचा सूडाच्या भावनेने मेन्तिक्योर चा जन्म झाला. हा राक्षस खूप खतरनाक आणि उपाशी आहे त्याला जे भेटेल ते तो खातो. माणसांना खायला गेला तर त्याचे कपडे सुद्धा ठेवत नाही.
( वेध: हॅलो वाचक जर का तुम्हाला मेन्तिक्योर ला पहायचं असेल तर गूगल करा. आता तुम्ही बोलत असाल मला गूगल कसे माहित मी तर १९०० मध्ये आहे. तर तुम्हाला सांगतो मला सर्व माहित आहे.)
फकीर:वेध काय होते मध्येच तुला.
वेध: काही नाही..
नताशा: याच्या वरचा उपाय काय.
वेध: उपाय नाही कारण मेन्तिक्योर आला आहे आणि त्याला रोखण्या करिता ग्रिफीन येणार आहे.
फकीर: आता ग्रिफीन कोण
वेध: जेव्हा देवाने ल्यूसिफर ला नर्कात सोडले त्या नंतर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सर्व अँजेलना जोडून एक पक्षी तयार होतो. तो शरीराने गरुडा सारखा असतो. फक्त उंचीला फार मोठा असतो. जेव्हा पासून मेन्तिक्योर नर्कात होता तो पर्यंत तो सूर्या जवळच्या भागात होता. आता कुठे ही असू शकतो. आता या दोघांन मध्ये एक भयंकर युद्ध होणार आहे आणि ते आपल्या सर्वांना गिळून जाईल.
फकीर: गिळून जाईल म्हणजे खरंच का.
वेध: नाही.... म्हणजे नष्ट करीन.
फकीर: हा ओके.
नताशा: याच्यावर काही उपाय आहे का मग.
वेध: फेईनिक्स.
नताशा: फेईनिक्स.....
फकीर: फेईनिक्स म्हणजे एक पक्षी आहे. माझ्या ट्रनिंगच्या दरम्यान हे सांगितले होते. की जेव्हा पण कोणते संकट पृथ्वभोवती फिरणार तेव्हा फेईनिक्स आपल्या पवित्र आगेत त्याला भस्म करणार. आणि स्वतः सुद्धा भस्म होणार.
नताशा: आणि मग..
" परत जन्म होणार " मागून पटेलचा आवाज ऐकू येतो.
सर्व मागे बघून उभे राहतात.
हॅलो सर,
पटेल: माझ्या शिवाय चर्चा कशी काय करताय.
फकीर: सर नाही. फक्त बोलत होतो. मी तुम्हाला ओळख करून देतो.
पटेल: नाही नको. मला माहित आहे. मीच यांना कामाला ठेवले आहे.
फकीर: काय
पटेल: जेव्हा पासून काळ येणार आहे असे मला कळाले. तेव्हा पासून मी एक स्पेशल टीम तयार करत आहे. त्या मधल्या दोघांना तू भेटला आहेस.
(वेध: हा हा आता तुम्ही बोलणार मी पहिले का तुम्हाला सांगितले नाही. तर आजुन खूप काही होणार आहे त्या बद्धल तुम्हाला अंदाज पण नाही माहित. तुम्ही वाचा.)
फकीर: तर ही माझी टीम आहे. यांच्या कडे काय असे खास आहे की माझ्या सोबत काम करणार.
पटेल: हा.. तुझ्या पेक्षा खास आहेत यांच्या कडे.
फकीर: काय
नताशा: मी लहान पणापासून एका जादुगराच्या घरात राहीले आहे. म्हणून मला थोडी फार जादू येते.
फकीर हसत म्हणतो जादू.....
नताशा नमुना दाखवते
नताशा: विंग फायर....
अचानक नाताशाला दोन आगीचे पंख येतात आणि ती उडू लागते.
फकीर आश्चर्यचकीत होतो.
फकीर: मग तू त्या चेंबर मध्ये काय करत होतीस
नताशा: मी तिथे मेन्तिक्योर येऊ नये म्हणून मंत्र म्हणत होती तेवढ्यात तुम्ही आलात.
फकीर: ओके.
वेध कडे पाहून फकीर म्हणतो "आणि तू काय करतोस"
पटेल: ते राहुदे. वेळ आल्यावर तू पाहशील.
फकीर: ओके ठीक आहे.
पटेल: बर मीटिंग संपली. जा आपआपली कामे करा. बर मी विसरून गेलो होतो तुम्हाला तुमची काम करायची जागा दाखवतो.
चला या..
सर्व पटेलच्या मागे जातात.
एका दरवाजा समोर येतात.
पटेल: फकीर तुला कोड माहित आहे
फकीर: हा माहित आहे.
फकीर मोठ्या आवाजात बोलतो. रंग हो बेधुंद, मन माझे धुंद, नाही छंद करू ठेवू नकोस दरवाजा बंद.
अचानक तो दरवाजा उगडतो.
वेध: एवढा मोठा कोण कोड ठेवतो.
पटेल: ठेवावा लागतो.
वेध: मला नाही पाठ होणार.
पटेल: करावा लागेल.
सगळी आत जाऊ लागतात.
आत एक मोठा असा रूम असतो.
फकीर: मस्त. बंर आहे.
पटेल: याच्या वर तुम्हाला लगेच समजेल असे हे यंत्र आहे.
फकीर: मेन्तिक्योर आलेला समजेल.
पटेल: नक्कीच. जेव्हा लाल लाईट दिसेल तेव्हा मेन्तिक्योर आला. आणि हिरवी लाईट दिसेल तेव्हा ग्रिफीन. समजलं ना.
जो पर्यंत ही केस संपत नाही तो पर्यंत तुम्ही इथे राहायचे. राहण्याची सोय आहे इथे.
फकीर: ओके माझी विश्रांती ची वेळ झाली आहे
पटेल: हा मी पण जातो.
तेवढ्यात लाल लाईट दिसायला लागले.
सगळी दचकून जातात.
कारण मेन्तिक्योर आला आहे........
YOU ARE READING
फकीर
FanfictionThis story is fully in imagination There is not any Religion or Socity. This is Fun And Enjoy this