अपोलो (भाग ३)

73 0 0
                                    

सण १८९९ डिसेंबर ५.
फर्नांडिस एका हिऱ्यांच्या खाणीत हिरे बाहेर पडण्याची वाट बघत होता.
फर्नांडिस: लवकर करा... किती वेळ लावताय एक काम धड होत नाही तुमच्या कडून.
रॉबिन: हो! होईल कशाला टेंशन घेताय.
( रॉबिन हा खाणीचा पहिला मालक असतो पण काही कारणं मुळे त्याने ती खाण फर्नांडिस ला विकतो)
हिरे हळूहळू बाहेर येत होते. तेवढ्यात तिथे नताशा येते.
नताशाला‌ पाहून रॉबिन हळूच निघून जातो.
नताशा: हे काय करताय इथे. उगाच कशाला तुमच्या प्राणाशी खेळताय काळ येणार, काळ येणार, काळ येणार.
फर्नांडिस: कोण आहे ही हिला बाहेर फेकून द्या. लवकर करा
फर्नांडिस नताशाला खाणीतून बाहेर काढतो आणि कामाला लागतो हिऱ्यांच्या साठ्याबरोबर एक पुस्तक फर्नांडिस ला भेटले त्या मध्ये भाषा वेगळी होती म्हणून त्याने ते पुस्तक तिथेच सोडले.
हिरे जमा करून फर्नांडिस तिथून सगळ्यांना घेऊन जातो. आणि तो गेल्यावर ते पुस्तक चमकू लागले!

Unknown sky
फकीर: हे कसे शक्य आहे इतक्या लवकर म्हणजे आता काय करायचे.
वेध: कुठे आला आहे नेमका.
पटेल: आता नेमका म्हणजे आपल्या २५०० किलोमिटर लांब आहे.
फकीर: त्याला यायला अजून किती टाईम लागेल.
वेध: १ तास.
फकीर: येवढ्या फास्ट कसा काय.
वेध: तो फास्ट नाही आपुण स्लो आहे.
पटेल: मग काय करावे लागेल आता.
वेध: जीवनाच्या पुस्तकात बघावे लागेल.
फकीर: ते पुस्तक काढ आणि वाच लवकर.
वेध: माझ्या कडे नाही ते पुस्तक.
नताशा: मग कोणाकडे आहे.
वेध: फर्नांडिसच्या हिऱ्यांच्या खाणीत.
पटेल: ओके तर तुम्हाला एक टास्क भेटला. तुम्ही तिघेही त्या खाणीत जाययं आणि.
फकीर: सर मला माहित आहे. तुम्ही फक्त इथे थांबून आम्हाला गाईड करा.
ती तिघे मिळून खाणीत पुस्तकाचा शोध घ्यायला जातात.

हिर्यांची खाण
फकीर: वेध शोध लवकर कुठे आहे ते पुस्तक.
वेध: मी एकटाच शोधू.
नताशा: वेळ नाही आपल्याकडे लवकर शोध.
वेध: हे बघा मेन्तिक्योर पहिला इथेच येणार कारण तो पहिला हेच पुस्तक नष्ट करणार.
फकीर: का
वेध: हे बघा मेन्तिक्योर आला आहे म्हणजे ते पुस्तक ग्रिफीन ला बोलावण्याचा प्रयत्न करत असणार. पण जो पर्यंत त्याला एक मनुष्याचा हात लागत नाही तो पर्यंत ते काम करणार नाही.
नताशा: आता फक्त १५ मिनिटे राहिली आहे शोधा.
तिघेही पुस्तक शोधू लागतात
वेध: फकीर, नताशा इकडे या.
ते दोघेही वेध कडे जातात
फकीर: काय झालं.
वेध: हे बघ पुस्तक.
नताशा: हे चमकत का आहे.
फकीर: चमकुदे ते! बाहेर बघा.
सगळी बाहेर बघतात. बाहेर मेन्तिक्योर थांबलेला असतो.
मेन्तिक्योर ला पाहून ते हादरून जातात. त्याच्या लाल बुंध डोळ्यामध्ये अहंकाराची, सर्व‌ का‌‍ही‌ नष्ठ करण्याची आस होती.
वेध: फकीर जा लवकर‌ घे ते पुस्तक.
मेन्तिक्योर वेगाने त्या पुस्तकाकडे धाव घेतो. पण तो पर्यंत ते पुस्तक फकिरच्या हातामध्ये होते.
अचानक पुस्तकामधुनी सोनेरी किरने येऊ लागतात ते पाहून फकीर पुस्तक फेकून देतो आणि त्या पुस्तकांमधून गरुडासारखा आवाज येतो आणि दुसऱ्याच क्षणी ग्रिफीन तिथे हजर होतो. गरुड आणि सिंह हे दोघे एकत्र म्हणजे ग्रिफीन त्याचे पूर्ण शरीर सिंहा सारखे होते आणि गरूडा सारखे पंख. त्याचे सोनेरी डोळे, पाहून सगळ्यांच्या मनात आनंदाची भावना वाढू लागली.
पण त्याला निरखून पाहू पर्यंत मेन्तिक्योर त्याच्यावर तुटून पडला मेन्तिक्योर त्याच्या वर वार करत आहे हे पाहून ग्रिफीन ने त्याचा हात आपल्या लांब नखात धरून खाणीच्या बाहेर काढला.
वेध: फकीर यांचे युद्ध खूप वाढणार आहे. तू पुस्तक घे ते लवकर.
फकीर: आरे जा ना मग तूच घे ना ते पुस्तक
वेध: मी नाही घेऊ शकत घे जा

फकीरWhere stories live. Discover now