मैत्री भाग 3

68 0 0
                                    

            ............. मागून अचानक आवाज आला! मागे वळून पहायची भीती वाटत होती. कारण कोणालाही माहीत न्हवत की समीक्षा कोण आहे. मागे वळून बघितलं तर माझ्या वर्गातली एक मुलगी होती संजना तिला ही बातमी रमाने सांगितली होती तिच्या कडे बघितलं तर तिने नजर खाली घेतली. तिचा मला खूप राग आला होता मला तो सहन होत नव्हता पण रमा वर काढू शकत न्हवतो. आणि बाकीच्या वर्गातल्या मुलींना माहीत न्हवत फक्त पाच सहा मुलींना माहीत पडले होते. या गोष्टी चा राग काडण्यासाठी तुषार कडे गेलो. तो पण गप बसला होता त्याच्या कडे गेलो त्याने मला बसायला सांगितलं मी त्याच काही ऐकलं नाही त्याला एक एक शब्द ऐकवला. मुली पण टेन्शन मध्ये यायला लागल्या. आमचं भांडण संपायला आल.
मी: मी आता तुझ्या सोबत नाही बसणार
तुषार: पाहिजे तर मार पण जागा सोडू नकोस तुला बसायला जागा नाही भेटणार
मी: ते माझं मी बघतो
तुषार च पुढचं शब्द ऐकायला मी तिथे थांबलो नाही मी लास्ट बँचर होतो आता पहिल्या बँच वर गेलो तिथे दोघं जन बसले होते एक होता खीलारी आणि घारे दोघंही अभ्यासात लक्ष देत न्हावत्यात आणि मस्ती मध्ये घारे हुशार होता मी तिथे गेलो आणि त्याला म्हणालो मला इथं बसायचं आहे..
घारे: खाऊ आहे का
मी: काय
घारे: जागा नाही
मी: माझ्या जाग्या वर जा तू
घारे: मग चालेल
कारण माझा लास्ट बँच हा कोणाला पण नाही मिळत. आणि घरेला मुळीच नाही.
तो गेला बॅग घेऊन मी त्याच्या जाग्यावर गेलो  बसलो तिथून मी तुषार आणि घारे च संभाषण ऐकत होतो तुषार त्याला बसायला देत न्हवता तो म्हणत होता माझ्या मित्राची जागा आहे इथं कोणालाच बसवणार नाही मग घारे परत आला मला म्हणाला नाही घेत मग मी म्हणालो मी काय करू..
                 तो रडायला आला होता मग मीच त्याला पुढची जागा दिली. माझी आणि तुषार ची मैत्री वर्गात मशुर होती सगळ्यांना कळलं की ही दोघे बोलत नाही का बोलत नाही हे कोणालाच माहित न्हवत मग एक एक करत सगळी माझ्या जवळ येत होत्यात मला अभ्यास करू देत न्हावत्यात मग एक मुलगी आली तिच्या बद्दल मला खूप कौतुक वाटतं होत कारण ती कधी तरी बोलायची दिसायला सुंदर आणि कधी पण प्रेमानेच बोलायची कधी माझ्यावर तिने राग काढला नाही तर कधी नाही सुद्धा म्हणाली न्हवती. ती आली मला कळलं की तुषार नीच तिला पाटावल आहे. मी मागे वळून बघितलं तर त्याने नजर फिरवली मी जाग्या वरून उठलो ते बघितल्यावर ती मुलगी टेन्शन मध्ये आली तिला वाटले की आता मी जाऊन त्याला मारेल पण मी तस काही केलं नाही मी फळ्याच्या समोर गेलो आणि समोरच्या बाकड्यावर जाऊन उभा राहिलो. ती मुलगी म्हणाली खाली उतर नको सांगुस कोणाला. मी तिचं ऐकलं नाही आणि सगळ्यांना आवाज दिला आणि म्हणालो नविन खबर आहे ऐका.

प्रेम विचित्रWhere stories live. Discover now