.........सर्व आयुष्य बदलून गेले होते मी खूप काही गमावून बसलो होतो माझ्या आयुष्यात काहीच उरले न्हवते त्या दिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा सगळे आनंदात होते मी सगळ्यांना विचारलं का येवढ्या आनंदात आहात तर आई बोलू लागली आनंदात राहण्यासाठी काही कारण नाही लागत.
हे सर्व मला पण समजत होत पण मन पूर्णपणे दुःखी होते पुढच्या दिवशी शाळेत गेलो शाळेचे आखेरचे दिवस म्हणजे सुट्टी सुरू होणार होती खूप काही शिकायला मिळालं आणि खूप काही गमावून बसलो होतो एक मित्र ,एक मनापासून प्रेम केलेली व्यक्ती आणि माझे वर्षाचे 4 महिने हे वाया गेले होते हे सर्व तर गेले होते पण या वर्षी माझे टक्के पण खूप कमी झाले होते हे वर्ष नववीचे होते सर्व शिक्षकांचा विश्वास होता पण मी तो पूर्ण करू शकलो नाही कमी टक्के पडले म्हणून शाळेत सर्व रागात होते पण घरी आनंद झाला होता कारण मी कधीच घरी अभ्यास केला नाही जे काही आहे ते शाळेत करत होतो घरी केव्हा तरी करायचो तेव्हा.
आता दहावीचे वर्ष होते म्हणून मी गावी पण गेलो नाही आणि सर्व काही विसरण्यासाठी अभ्यास एकच पर्याय उरला होता . अभ्यासात पूर्ण लक्ष घालायचं हाच एक उपाय होता मी तो स्वीकारला आणि वेकेशन बेच सुरू झाली होती पूर्ण बेचं मी लिखाण केलं आणि जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा फक्त पाठांतर करत होतो दहावीचं वर्ष चाललं होत वर्षामध्ये खूप वेळा विचार केला की एकदा जाऊन समीक्षा ला भेटाव. पण कधीच हिम्मत झाली नाही जेव्हा मी तिला विसरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अजुनच आठवत जात होती. म्हणून तिचा विचार करीत होतो तुषार रोज दिसत होता आणि त्याच्या कडे बघून मला खूप बोलायचं होत पण मलाच माझी लाज वाटत होती काय करू समजत न्हवत मी विजय सोबतब असायचो. जेव्हा बोर्डाचा पेपर सुरू होणार होते मी मग स्वतःहून तुषार सोबत बोलायला सुरुवात केली.
पेपर साठी कोणती शाळा लागली आहे ती पण बघून आलो. पहिला पेपर होता मी गेलो अजून अर्धा तास होता म्हणून बाहेर बसलो होतो तोवर मला एक आवाज आला माघे बघितलं तर अजून कोनही नसून वैभव होता हा तोच ज्याने मला तिची आठवण करून दिली.
मी गेलो त्याचा जवळ त्याला पण हीच शाळा लागली होती त्याच्या सोबत बोलत बोलत त्याने सांगितलं की परवा सरांचा वाढदिवस आहे.
मी: कोण
वैभव: मोहिते सर
मी: ओक्क
वैभव: उद्या आपण जायचं आहे
मी: चालेल केव्हा
वैभव: पेपर संपल्यावर
मी: अजून कोण आहे
वैभव: समीक्षा....
मी गप्प झालो कारण वैभव ला माझ्या आयुष्यात काय झालं आहे ते अजून माहीत नाही.
मग मी म्हणालो नाही रे जमणार उद्या काम आहे एक सॉरी यार पण तो काय ऐकायला तयार न्हवता मग मी उगाच हा म्हणालो आणि पेपर साठी गेलो.
मी पेपर देऊन घरी गेलो आणि पुढच्या दिवशी काय करायचं ते मला काय समजत न्हवत मग माझीच हिम्मत होत नव्हती तिच्या समोर जायची कारण मी तिचा अपराधी होतो हे मला वाटतं होत.
पुढच्या पेपरला मी गेलो वैभव आला आणि मी थोडा वेळ गप्प होतो नंतर त्याला आता पर्यंत काय घडलंय ते सगळ सांगितलं तो जरा वेळ गप्प झाला आणि म्हणाला तुझी काही चुकी नाही तू घाबरु नकोस मी आहे तुला बोलण्या आधी तिला माझा सामना करावा लागेल मग मी गप्प झालो आणि पेपर सोडवायला गेलो.
पेपर सोडवून आल्यावर मी बाहेर होतो तोवर वैभव आला आणि मला पकडलं आणि सोबत घेऊन जात होता मी पण शांत होत विचार करत होतो की पुढे काय.
वैभव पुढे गेला कारण त्याला समिक्षाला सुद्धा घ्यायचं होत तो गेला मी पण हळू हळू जात होतो. तोवर मी बघितलं आणि एका झाडा मागे जाऊन लपलो मी बघत होतो की केव्हा समीक्षा येतीया आणि केव्हा ती जात्याताया. पण ती आली नाही वैभवने मागे बघितलं तर मी पण दिसत न्हवतो मग वैभव एकटाच गेला मला जरा वाईट वाटले पण माझा नाईलाज होता.
असेच सर्व पेपर संपले आणि गावी गेलो दिढ महिने राहिलो रिझल्ट पण लागला पास झालो आणि मग मुंबई ला आलो.
मुंबई ला आल्यावर मग एक जुना मित्र भेटला सुरेश तो खूप जवळ होता त्याला पण सर्व काही सांगितलं सर्वात जास्त माझी केअर करणारा मित्र आहे नंतर कळाल की उद्या समिक्षाचा वाढदिवस आहे. म्हणून मी एक गिफ्ट घेतलं आणि वैभवच्या हातात दिलं पण नंतर कळलं की वाढदिवस कॅन्सल झाला आहे. मग तिची आठवण म्हणून मी ते गिफ्ट स्वतःकडे ठेवलं.
कॉलेज सुरू झालं होत सर्व काही नवीन दिसणार होत पण येवढं नशीब कुठलं........
ही सर्व गोष्ट झाली भूतकाळातील वर्तमान मध्ये आजचा दिवस तोच होता त्या दिवशी समीक्षा चा वाढदिवस होता. मी आधीच सांगितलं होत की मी येणार नाही पण एका तासाच्या वादानंतर मीच म्हणालो की जोवर तू माझ्या समोर तिला कॉल करत नाहीस तोवर मी येणार नाही. मग त्याने कॉल केला आणि म्हणाला की संकेत आला तर चालेल का. ती म्हणाली चालेल. पण मला जरा डाऊट येत होता मग मी तयार झालो आणि वाढदिवसाला गेलो सोबत जो मित्र येणार होता तो आला नाही कारण त्याच प्राक्टीकल होत मग मी आणि वैभव आणि काही जुने मित्र होते.
वाढदिवसाला गेलो पण तिथे जे झाल ते मला सांगता येणार नाही.............
या माझ्या छोट्याश्या अशा एक तर्फी नजरेने मला खूप काही दिले पण आणि खूप काही घेतले पण. दिले म्हणजे सबक आणि घेतली ती माझी खुशी. याच्या वरून मला एकच प्रश्न पडत असतो की यात माझीच चुकी होती का ?
तिच्या साठीच लिहिलेल्या या दोन ओळीआयुष्य कसे सरकत चाललंय जाणीव त्याची नाही
मन माझे गुंतत चाललंय आठवण तिची नाही
वेळ माझ्याकडे राहिला नाही
काम खूप आहे
मेंदू माझा विचार करतो हृदयाचा संबंध नाही.
श्रणाची आठवण तुझी अधुऱ्या जिंदगी.
मनाची भावना माझी बिन रंगीत.
तू पाहू नकोस परत माझ्याकडे
माझ्याकडे सहनशक्ती नाही
जीव माझा घेऊन जाशील
एकच आस फक्त राहीलएवढ्यातच मी थांबतो माझे प्रेम विचित्र!