कळत नकळतच
भाग एक : दरवळ सुगंधाचा
पहाटेची सूर्याची किरणे एव्हाना तिच्या बेडरूम मध्ये शिरकाव करू लागली होती. तिच्या लाल रंगाच्या गाऊन मध्ये तिचा शरीराचा उभार स्पष्टपणे दिसत होता. तिच्या छातीचा उभार जणू काही गाऊन च्या संरक्षक भिंती छेदून बाहेर येण्यास धडपडत होता. तिचे लालबुंद डाळींबी ओठ फारच मादक होते. तिची केसाची लट पुन्हा पुन्हा ती चेहऱ्यावरून साखर झोपेतच दूर करत होती.....पण ही मादक शरीराची मालकीण होती तरी कोण? सुगंधा. कालनिर्णय मध्ये आजची तारीख लाल रंगात दिसत होती म्हणजे आज रविवार. कॉलेजचा सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस म्हणून ती आपले कामुक शरीर घेऊन अजून बेडवर लाल रंगाचा गाऊन घालून सुखी झोप घेत होती.
सुगंधा ही फायनल इअर आर्ट्स ची विद्यार्थीनी. वय वर्ष अवघे एकवीस वर्ष. पण कॉलेज मध्ये सर्व जण तिला आपल्या मिठीत घेण्याचे स्वप्न बघत होते. पण सुगंधा मात्र घरंदाज मुलगी. कॉलेज मधून डायरेक्ट घरी येण्याची ताकीद. तर मग प्रेम वैगेरे सर्व काही तिला मृगजळ होते. ती स्वतः त्या प्रेमाच्या वाटेवर जाऊ पाहत नव्हती. गजर च्या घड्याळात सकाळचे आठ वाजले हे जेव्हा तिने पाहिले तेव्हा कॉलेजला उशीर होईल या धास्तीने ती घाई घाईत उठली. पण इतक्यात तिला आठवले की आज रविवार आहे. ती स्वतः वरच हसली पण आता झोप पूर्णपणे उडाली होती. ती निमूटपणे उठली आणि सकाळच्या तयारीला लागली. थोड्या वेळाने ती बाथरूम मधून बाहेर आली आंघोळ करून. तिने आता sleeve less pink रंगाचा सलवार कमीज घातला होता. अंग अजुन साधारण ओलसर होते म्हणून तिचा ड्रेस काही ठिकाणी तिच्या शरीराला चिकटून होता. परिणामी तिचा शरीराचा आकार त्या पोषाखामध्ये सुबक दिसत होता. पिंक तिचा आवडता रंग. तिने पिंक रंगाचा ड्रेस घातल्यावर तिच्या गुलाबी ओठांचा रंग जणू त्या ड्रेस मध्ये ओंसाडून वाहत होता. ती ओले केस आणि टॉवेल घेऊन गच्चीवर गेली. केसावरून आंघोळ केल्यावर ती केस पुसण्यासाठी गच्चीवर जात असे. तिने आज ही तेच केले. गच्चीवर अर्धवट वाकून ती टॉवेल ने केस झाडू लागली. तिचे लक्ष पूर्णपणे केसांवर होते. किंचितसे मधुर आवाजात ती कोणत्या तरी हिंदी चित्रपटाचे गाणे गुणगुणत होती. अर्धवट वाकल्यामुळे तिचा लोअर नेक चा ड्रेस थोडासा जुना पातळ झाल्याने खाली किंचितसा लोंबकळत होता. त्या ड्रेस च्याच गुहेतून तिचे उरोज जणू काही बाहेर डोकावत होते. तारुण्यात न्हाऊन निघालेले तिचे वक्ष स्थळ तिच्या हालचाली नुसार ड्रेस च्या बंधनाला जुमानत नव्हते. यावेळेस गच्चीवर कोणी नसते म्हणून ती बिनधास्त आपले केस टॉवेलने पुसत होती. रो हाऊस संस्कृती मुळे रो हाऊस एकमेंकाना चिकटून उभे होते. म्हणजे शेजारच्या रो हाऊस चा रहिवाशी सुगंधाच्या रो हाऊस च्या गच्चीवर सहज येऊ शकला असता.
सूंगंधा आपल्या कामात मग्न होती. आणि तिच्या लक्षात नाही आले की शेजारच्या रो हाऊस मधून एक सावली शेजारच्या गच्चीवर आली होती. आणि ती सावली अचानक स्तब्ध झाली होती. आणि का स्तब्ध होणार नाही कारण शेजारच्या गच्चीवर निसर्ग आपले जलवे दाखवत होता. तिला चुकून सुध्दा कळले नाही की तिला कोणी न्याहाळत होते. पण ती सावली होती तरी कोणाची. शैलेश. तिच्या शेजारी राहणारे higher middle class कुटुंबा मधील एक सदस्य. शैलेश हा एक शिक्षकी पेशातला २५ वर्षाचा तरुण. दिसायला सावळा. केस देवानंद सारखे मागे वळवलेले. घरात पैशाची रेलचेल असल्याने कपडे त्याचे नेहमी ब्रँडेड आणि कडक इस्त्रीचे असे. आईवडील , लहान बहीण आणि शैलेश असा छोटंसं आणि परिपूर्ण कुटुंब. लहान पणा पासून जे शैलेश ने मागितले ते ते त्याच्या आईवडिलांनी दिले होते. याउलट सुंगंधा च्या घरी तिच्या मागून दोन लहान बहिणी , आई वडील अशी women oriented family होती की नेहमी त्यांना पैशाची बाजू सांभाळून घ्यावी लागे. दोन परस्पविरोधी परिस्थितीत वाढलेले दोन तरुण जीव. सुगंधा आणि शैलेश.
आज हे दोन जीव गच्चीवर उभे होते ज्यात शैलेश तिच्या त्या रसरसत्या तारुण्यावर घायाळ होत होता. अचानक सुगंधा शुध्दीवर आली. तिला कळून चुकले की शैलेश ची नजर तिच्या छातीवर आहे तसे तिने लगबगीने टॉवेल आपल्या खांद्यावर टाकून आपली छाती लपवली त्या शैलेशच्या नजरेपासून. त्या मादीने रागाने एक कटाक्ष टाकला त्या नरावर. तसा तोही हडबडला आणि तो दुसरीकडे बघण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागला. ती हिरमुसली होऊन गच्चीवरून पायऱ्या उतरून नाहीशी झाली तसा त्यानेही आपला गच्चीवरून गाचा गुंडाळला.
क्रमशः
भाग दोन लवकरच.
YOU ARE READING
कळत नकळतच
Romanceतुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.