कळत नकळतच भाग १० (अंतिम)

2.8K 9 3
                                    


कळत नकळतच
भाग दहा : गोड शेवट

           शैलेश आणि सुगंधा.... नव विवाहित दाम्पत्य.... नवीन संसार.... नवीन स्वप्न....सर्व काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत सुरू होते. नवीन संसार रोज नवीन इच्छेची घडी मोडत असे. आनंदाला जणू काही उधाण आले होते. सकाळी उठल्यावर बेडवरच्या अस्ताव्यस्त झालेल्या बेडशीट वरून रात्री कामवासनेेचे वादळ किती उंच प्रहराला गेले होते यांचा अंदाज बांधता येत होता. हा हा म्हणता सहा महिन्याचा काळ लोटला. यौवनाचा उंच प्रहर आता हळू हळू अधू होत होता. सुंगंधामध्ये जास्त काही फरक जाणवला नाही. ती तितक्याच जोमाने आताही प्रेम करत होती. पण शैलेशमध्ये तो जोम आता ओसरत होता. सर्व काही माणसाला सहज भेटले की त्यास चरबी चढते. शैलेश पुन्हा बाहेर तोंड मारू लागला. चॅट साईट्स, सोशल मीडिया यावर नवीन शिकार शोधू लागला. दोन महिने तोंड मारून सुद्धा हवं तसे यश आले नाही. तेव्हा त्याला मुग्धाची आठवण आली. मुग्धाच्या घराभोवती घिरट्या घालू लागला. शैलेशने दिलेल्या विश्वासघातामध्ये ती तुटून गेली होती. वेडी व्हायची बाकी होती. फक्त स्वतच्या मुलाबद्दल असलेले प्रेम तिला या खोल दरीतून ओढून आणत होते. ती या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होती.

                 शैलेशच्या आईने अचानक आपण सासू असल्याचा आव आणला. सुगंधाकडून पुन्हा हुंडा म्हणून तीन लाख मागू लागली. सुगंधाच्या वडिलांची तितकी परिस्थिती नव्हती. कारण जे होते ते त्यांनी लग्नात अगोदरच दिले होते. आता हुंड्या वरून सासू सूनेवर खटके उडू लागले. शैलेश पण आपल्या आईची बाजू घेत होता. शैलेश आणि त्याची आई सुगंधास घालून पाडून बोलू लागले. सुगंधाचा जीव टांगणीला लागला होता. तिला काहीच सुचेना. काही दिवसापूर्वी सगळे काही चांगले चालू असताना लोक हुंड्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतील असे तिला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. सुगंधासारख्या सुशिक्षित मुलींवर सुद्धा हळू हळू सासुरवास छळ सुरू झाला होता. सुगंधाचा जीव संसारात आता रमेनासा झाला होता. शैलेशचे प्रेम कमी झाल्याने तिला शैलेशचा खरा चेहरा दिसू लागला होता.

कळत नकळतचDonde viven las historias. Descúbrelo ahora