कळत नकळतच
भाग चार : प्रेमात गंधाळलेली सुगंधा
एकवीस वर्षाची कोवळी सुगंधा की पस्तीस वर्षाची परिपक्व कोरीव मुग्धा ही शैलेश च्या द्वीधा मनःस्थिती चे मुख्य कारण. या द्विधा बाजूंना अजुन दोन बाजू होत्या. एक होती वासनांध शैलेशला या दोन्ही अप्सरा बरोबर मधुचंद्राच्या रात्रीची चव घ्यायची होती. या दोघी बरोबर वासनेची तहान भूक भागवायची होती. प्रेमाच्या मुखवट्या मागे सेक्स च्या राज्यात त्या दोघींच्या प्रत्येक अवयवाला चूंबनाचे व्यसन लावायचे होते. दुसरी बाजू म्हणजे जेवणात जसा अचानक नको असा मिठाचा खडा येतो तसा या दोन्ही अप्सरा शैलेश पासून दूर पळत आहेत असा त्याला भास होत असे. साहजिकच ही दुसरी बाजू कोणत्याही Hunter ला नको असते.
दोघीच्या बरोबर तोंड ओळख झाल्यावर शैलेशचा चेपावलेला धीर आता अधीर झाला होता. सकाळी तो अधीर जरी असला तरी रात्री त्या दोघींच्या कल्पनेने तो अधाशी होते असे. सुगंधाच्या तर तो सावली सारखा पाठलाग सोडत नसे. मुग्धाबरोबर बोलण्याची एकही संधी तो दवडत नसे. सुगंधा कॉलेजमध्ये निघाली की तो लगेच तिच्या मागून निघत असे. तिला हाक मारून आपण योगायोगाने भेटलो याची तिला आपल्या अभिनयाने जाणीव करून देत असे. त्या कोवळ्या हरणीला या धूर्त लांडग्याची वासना दिसत नसे. तो तिला अभ्यासाची विचारपूस करून तिला बॉयफ्रेंड आहे का, बॉयफ्रेंड का नाही, तुझ्या आपल्या प्रियकराबद्दल काय अपेक्षा असे हसत हसत प्रश्न विचारत तिला या अभ्यासाच्या झोन मधून प्रेमाच्या झोनमध्ये आणत असे. अशा विषयावर आजपर्यंत तिने कधी चर्चा केली नव्हती. पण तिला हे विषय साहजिकच वेगळे वाटत होते पण ती वयाच्या ज्या वळणावर होती की प्रथमच तिला या विषयामध्ये रुची वाटत होती. हळूहळू शैलेश आणि सुगंधाची मैत्री आकार घेत होती. सुगंधा कॉलेजला निघाली की शैलेशला मिस कॉल देत असे तसा शैलेश दोन मिनिटात हजर. शैलेश कधी कधी गमतीने तिचा हात घेऊन तिचे भविष्य सांगत असे.
शैलेश : बालिके तुझ्या जिवनात लवकरच एक राजपुत्र येणार आहे.
सुगंधा : (हसतच) महाराज, कोण आहे तो राजपुत्र?
शैलेश : ते मी इतक्यात सांगू शकत नाही, पण त्याचे नाव S वरून आहे हे मी नक्की सांगू शकतो बालिके.
सुगंधा : ( पुन्हा हसतच) तो घोड्या वरून येणार आहे की गाढवावरून ?
शैलेश : तो तर बाईक वरून येणार आहे आणि हो आज त्या राजपुत्राने Chequered शर्ट घातला आहे असे बोलून त्याने मीही चौकटीचा शर्ट घातला आहे हे तिच्या निदर्शनास आणून दाखविले आणि खुदकन हसला. तीही त्याच्या या गमतीवर हसली आणि वातावरणात प्रेमाचे अंकुर फुटू लागले.
ŞİMDİ OKUDUĞUN
कळत नकळतच
Romantizmतुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.