कळत नकळतच
भाग नऊ : मधुचंद्राची रात्रशैलेशच्या दोन्ही हातात आता लाडू होते. सुगंधा आणि मुग्धा या दोन्ही लावण्यवती त्याच्या बोटावर नाचत होत्या. हवे तेव्हा तो या दोन सौंदर्याचा आस्वाद घेत होता. त्या दोंघीच्या आयुष्यात न भूतो न भविष्ये असा आनंद दरवळत होता. रात्रीच्या काळोखात शैलेश त्या दोंघीच्या तारुण्याचा लचका तोडत असे. त्या दोन गुबगुबीत शरीरावरचा प्रत्येक शहारा हा शैलेशच्या मर्जीने उगवत असे आणि शैलेशच्या संमतीने लोप पावत असे. त्या दोघींच्या शरीरावर एकही असा अवयव नव्हता की ज्यावर शैलेशच्या हाताचा ठसा उमटवला नसेल. बोटांच्या चिमटीत प्रत्येक अवयव मंत्रमुग्ध झाला होता. सुगंधाचा गुलकंद आणि मूग्धाची मध तो चाटून पुसून फस्त करत होता. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये अशी जुन्या लोकाची म्हण आहे तशीच पोलिओचां डोस मोफत आहे म्हणून मुलासकट आई वडिलांनी घेऊ नये नेमकी तशीच गत होती.
सुगंधाचा पदवीचा रिझल्ट लागला पण त्यात ती जरी पास झाली तरी तिच्या कुवतीप्रमाणे मार्क काही भेटले नाही. कारण अभ्यासाच्या वेळी ती फक्त शैलेशचा विचार करत असे. परिणामी अभ्यासावर आणि निकालावर नक्कीच परिणाम झाला. दोंघीही शैलेशला लग्नाबद्दल विचारणा करू लागल्या. शैलेश करू करू बोलून त्याला चलाखीने टाळत असे. पण मुग्धा आता शैलेशच्या वागण्याबद्दल साशंक झाली होती. तिने त्याला लग्नबद्दल त्याच्या पालकांशी बोलण्याचा छडा लावला. शैलेशच्या घरी सुद्धा आता त्याच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. त्याचे नाव वधूवर सूचक संस्थेमध्ये नोंदविले होते. पण पाहिजे तशी मुलगी येत नव्हती. येणारा मुलींचा फोटो शैलेश नीट पडताळून पाहत असे. फोटोमध्ये फिगर मोजण्याचा प्रयत्न करत असे. पण त्या कोणत्याही फोटोत सुगंधाला तोडीस तोड अशी लावण्यवती नव्हती. कोणत्याही मुलींचा फिगर सुगंधाच्या ३२ २६ ३६ ला चॅलेंज करणारा नव्हता. साडीवर दिसणाऱ्या त्या मुलींचे फोटोच्या तुलनेत शैलेशच्या डोळ्यात चांनगलीच तरलेली ब्रा आणि पँटीवरील सुगंधाची मूर्ती त्या नैतिकतेच्या स्पर्धेत ही सहज सरशी घेत होती. शैलेशच्या घरचे रोज नवीन मुलींचे फोटो आणत असे. शैलेश त्या फोटोना सुगंधाशी तुलना करत असे. या तुलनेत सुगंधा एखाद्या विजयी उमेदवार प्रमाणे इतर मुलींचे डिपोझिट जप्त करत होती. शैलेशची चलबीचल वाढत होती. अखेर नाईलाजाने त्याने आपल्या घरी सुगंधाबद्दल सांगितले. सर्वात आधी शैलेशच्या घरी जात या प्रकरणामुळे विरोध झाला. तिकडे सुगंधाने घाबरत घाबरत आपल्या घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगितले. घरात अपेक्षेप्रमाणे कुरकुर सुरू झाली. सुगंधाच्या वडिलांना शैलेश आवडला नव्हता. पण त्यांना आश्चर्य वाटले की आपल्या हाताखाली जपून ठेवलेल्या या तिळाने कधी हे बस्तान बांधले याबद्दल त्यांना आपसूक नवल वाटले. पुढे कांदेपोहेचा कार्यक्रम ठरला. कार्यक्रम हा सुगंधाच्या घरी होता. दोन्ही पक्ष फार प्रेमानी बोलत होते. पण हे प्रेमाने बोलणे ओढून ताणून आणल्यासारखे हावभाव सर्वाचे दिसत होते. काही वेळाने मुलीला बाहेर बोलावण्यासाठी सिग्नल भेटला. तशी सुगंधा एक लाल रंगाची कांजीवरम साडी घालून बाहेर आली. साडीची बॉर्डर गोल्डन होती. साडीवर काजूच्याच आकाराची मोठी नक्षी गोल्डन कलर मध्ये उठून दिसत होते. मधासारखी गोड दिसणारी सुगंधाला ते गोल्डन काजू चार चांद लावत होते. थोडा वर कटाक्ष टाकला तर तिचं ते अरुंद हाफ स्लीवचे ब्लाऊज तिची लज्जत वाढवत होते. तिचे तंग ब्लाऊज तिच्या त्या देहावरिल उभारीला वेसण घालण्यासाठी झटत होते. तिचे आईवडील सोडले तर तिथे जमलेले सर्व त्या विलोभनीय युवतीच्या सौंदर्यात घायाळ झाले होते. कोणीही तिच्या वरची नजर हलवू पाहत नव्हते. काहींनी हलकेच आपले आवंडे गिळून आपल्या घश्यात लपवले. तिच्या वडिलांनी तिला बसण्यास खूण केली आणि ते मादक यौवन स्थानापन्न झाले. तिच्या तुलनेत शैलेश अधिकच उपरा वाटत होता. तो या स्पर्धेत स्टँड सुद्धा करत नव्हता. त्याने एक पिवळ्या रंगाचा कुडता आणि मरून कलर चा पायजमा घातला होता. ती जर त्या प्रसंगाची महानायिका होती तर तो या प्रसंगात एखादा नायकाच्या बाजूचा सह कलाकार सारखा अगदीच सिंपल वाटत होता. असो कार्यक्रम पुढे सरकला. नेहमीचे ठरलेले प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरे ही नेहमीच्या ठरलेल्या चाकोरीत देण्यात आली. सर्व काही ठरल्यासारखे होते. इतक्यात घासात मिठाचा खडा आला. हा मिठाचा खडा म्हणजे शैलेशची आई. शैलेशच्या आईने एखाद्या विलनप्रमाणे हुंड्याचा विषय काढला. आणि फक्त पाच लाख आणि लग्नाचा सर्व खर्च मुलीकडच्यानी करावा अशी अट घातली. सुगंधाच्या कुटुंबाने तर याचा धसका घेतला. सर्व काही जुळून येता येता आता या विवाहात तुटक तुटक रेषा दिसू लागली.
ESTÁS LEYENDO
कळत नकळतच
Romanceतुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.