अनैतिक भाग १

13.3K 27 4
                                    

अनैतिक
भाग एक

जर तहान ही गळ्याची आहे आणि भूख ही जर पोटाची आहे तर ही तहान भूक आपला कणखरपणा तपासून बघत असते. एखादा व्यक्ती आपल्या जिभेवर, आपल्या पोटावर नियंत्रण ठेऊन ही तहान भुकेची लढाई जिंकतो. पण तहान कामवासनेची असेल आणि भूक ही संभोगाची असेल तर ही तहान भूक आपला मनावरचा ताबा तपासून पहात असते. आपला आपल्यावरचा ताबा नियंत्रण कक्षेचे कुंपण तोडून पसार होतो. हाच ताबा शेवटी एखाद्या सुंदर स्त्री किंवा पुरुषाच्या प्रेमाच्या मिठीत जाऊन विसावतो.

महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण. या महाबळेश्वरमध्ये काही महिन्यापूर्वी आदित्यची बदली झाली होती. आधी तो मुंबई ऑफीसला होता. या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये तो असिस्टंट मॅनेजर पोस्टवर कार्यरत होता. घरी एक सुंदर आणि समंजस पत्नी आदिती आणि त्यांची सात वर्षाची कन्या अनन्या. मुंबई मध्ये असताना आदित्य दिवसभर ऑफीसमध्ये असायचा जणू काही त्याने स्वतःस ऑफीससाठी झोकून दिले होते. पण त्याच्या अनुपस्थितीत एका कुशल पत्नी सारखे आदिती निभावून घेत असे. त्यामुळे आदित्य निर्धास्त होऊन ऑफीसच्या कामात लक्ष घालू शकत होता. तसे पाहिले तर त्याचे घरावर दुर्लक्ष होत होते. यावर आदिती थोडी कुरकुर करत होती. पण तरीही आदित्य आणि आदितीचा संसार सुरळीत चालू होता असे म्हणायला हरकत नाही.

आदित्यचे चांगले काम पाहून त्याच्या कंपनीने त्याला बढती दिली. आदित्यच्या कामाचे चीज झाले. पण त्याच्या प्रमोशनमध्ये एक छुपी खाच होती. ती म्हणजे आदित्यच्या कंपनीने एक महाबळेश्वरमध्ये नवीन प्लांट सुरू केला होता. या नवीन प्लांटमध्ये एक अनुभवी सुपरवायझर असणे आवश्यक होते म्हणून आदित्यला प्रमोशन देऊन त्याची बदली महाबळेश्वरला करण्यात येत होती. बदली हा शब्द ऐकून त्याने जिभेवर ठेवलेला मिठाईचा तुकडा त्याला खारट लागू लागला. पण ह्या बदलीकडे संधी म्हणून बघण्याची दृष्टी हवी होती. नवीन प्लांटमध्ये आदित्य सर्वात अनुभवी असणार होता त्यामुळे त्याचे नेतृत्व इथे फार महत्त्वाचे होते. बरेच वर्ष मुंबईला बॉसच्या हाताखाली काम करता करता बॉस बोलेल तिच पूर्व दिशा अशी त्याची गत झाली होती. पण या सगळ्या गोष्टींना छेद देऊन तो एक आदर्श बॉस बनून आपली टीम हॅण्डल करू शकेल अशी संधी त्याचे दार ठोठावत होती. आदित्यकडे होकार आणि नकार कळवण्यासाठी सात दिवस होते. तो सहकुटुंब आणि सहपरिवार महाबळेश्वर जाऊ शकत नव्हता कारण शालेय वर्षाच्या मध्यभागी तो अनन्याचे मुंबईच्या शाळेतील एडमिशन कॅन्सल करून महाबळेश्वरच्या एखाद्या शाळेत एडमिशन करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्याजोगे होते. वरून अनन्याचे शैक्षणिक नुकसान होईल ते वेगळेच. हे अडथळे लक्षात घेता आदित्यची पत्नी आदितीचे मत हेच होते की आदित्यने या प्रमोशनला नकार द्यावा. पण आदित्यला आलेली ही संधी वाया जाऊ द्यायची नव्हती आणि काय कुणास ठाऊक अशी संधी करियर मध्ये पुन्हा चालून येईलच की नाही याबाबत तो साशंक होता. आठवडाभर विचार केल्यावर, आदित्य आणि आदितीच्या छोट्या मोठ्या तंट्यातून एक उकल निघाली की आदित्यने निर्णय घेतला की तो हे प्रमोशन कम ट्रान्स्फर स्वीकारणार. त्याच्या निर्णयानंतर आदिती रागावली पण त्याने चलाखीने तिला समजावले. आता आदिती आणि त्यांची मुलगी अनन्या मुंबईतच राहणार होते. अजुन सहा महिन्यानंतर जेव्हा अनन्या आपले यंदाचे शालेय वर्ष संपवून दुसरीतून तिसरीत जाईल तेव्हा तिचे मुंबईच्या शाळेचे एडमिशन कॅन्सल करून तिला महाबळेश्र्वरच्या शाळेत टाकणार होते. एकदा एडमिशन झाले की आदिती आणि अनन्या हे आदित्य बरोबर महाबळेश्ररला राहू शकत होते. असा पुढचा सहा महिन्याचा प्लॅन बनवून आदित्यने आदितीला मनवून मिशन महाबळेश्वरचा पाया रोवला. दर पंधरा दिवसांनी शनिवार आणि रविवार पाहून आदित्य आपल्या कुटुंबास भेटण्यास येईल असा विश्वास आदित्यने आदितीला दिला. उद्या सकाळी आदित्य बसने महाबळेश्ररला रवाना होणार होता. पुन्हा पंधरा दिवसांनी त्याला आपले कुटुंब भेटणार होते. रात्री बेडवर अनन्या लवकर झोपली. आपले काम आवरून आपला घाम पुसत पुसत आदिती बेडवर आली. आजचा शेवटचा दिवस मुंबईतला म्हणून आदित्यने आदितीला बेडवर जवळ ओढले. आदितीची अजुन कुरकुर चालूच होती म्हणून तिने नकार देऊ केला. पण आदित्यला ही शेवटची रात्र वाया घालवायची नव्हती. गोल चेहऱ्याची, नाका डोळ्याने नीटस, गोरी पान फुलासारखी, आय ब्रो न केल्याने ते डार्क झाले होते पण तिच्या गोऱ्या कांतीला नक्कीच शोभत होते. ओठ लिपस्टिक शिवाय सुद्धा गुलाबी होते जणू काही ते गुलाबी ओठ चुंबानासाठी बनले होते. लग्नाला आठ वर्ष उलटली होती. शरीरात एक जाडसरपण आले होते. पण तो जाडसरपणा तिच्या बांध्यास, तिच्या फिगरला शोभून दिसत होता. लग्नाआधी ती चांगल्या फिगर मध्ये होती ज्यात कॉलेजची मुले फिदा होतील पण आता तो फिगरच गुबगुबीत फिगर मध्ये बदलला होता. त्या गुबगुबीत फिगरच्या लुसलुशीत त्वचेत एखादा पुरुष आपल्या बायकोला विसरेल आणि आदितीच्या नावाने जप करून रात्रभर तिच्या कुशीत झोपण्याची स्वप्न रंगविल. प्रेगनन्सी नंतर तिच्या कमरेवर चरबीचा थर साठला होता पण त्यामुळे तिच्या कमरेला पडणाऱ्या वळ्या खूपच मादक दिसत होत्या. आज घातलेल्या जांभळ्या रंगाच्या गाऊन मध्ये तिची गोरी कांती त्या मंद प्रकाशात सुद्धा उठून दिसत होती. टवटवीत कणीसासारखे तिचे बाहू स्लीव्हलेस मधून डोकावत होते. तिच्या छातीचा उभार त्या गाऊन मधून सुद्धा उठावदार दिसत होता. क्षणाचा विलंब न करता आदित्यने त्या मोहक स्त्रीस जवळ ओढले. तो तिच्या मानेवर चुंबनांचा वर्षाव करू लागला. त्याचा चुंबनाचा वेग तिच्यातील राग वितळवत होती. राग जसा वितळत होता तशी ती कामसागरात न्हाऊन निघत होती. त्या कामसागरात दोघेही ओलीचिंब झाल्यावर दोघांनी एकमेकाच्या कपड्याचा अडसर दूर केला. तिचे छत्तीस इंची वक्ष स्थळे त्याच्या हातात रुंदावली. जणू काही जीवनाचा शेवटचा दिवस या तन्मयतेने तो त्या वक्ष स्थळांना कुस्करत होता. तिची कडक झालेली स्तनाग्रे चिमटीत पकडून कुरवाळत होता. त्याच्या या ट्रिटमेंटने ती ३६-३०-३८ फिगरने नटलेली सौंदर्यवती उफाळली. ती पण त्याच्यावर तुटून पडली. पुढचे काही मिनिटे एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटी त्याने त्याचे ताठ झालेले पावणे आठ इंची लिंग तिच्या योनीत घुसवले. तिच्या तोंडातून एक वेदनामय चित्कार आला. तिचा चित्कार म्हणजे काम रसाचा सत्कार होता. तो मागे होऊन एकामागे एक स्ट्रोकस मारत होता. ती कामरसात मिसळून विव्हळत होती. शेवटी त्या दाम्पत्याने संभोगाचा परमोच्च बिंदू गाठला. दोघेही एकमेकाकडे पाठ करून झोपी गेले.

अनैतिकWhere stories live. Discover now