रक्तनटीका प्रकरण 3
खुप वेळच्या प्रवासानंतर ते गाव आले.त्या गावाचे नाव आंबेगाव.आंबेगाव हे एक निसर्गाचे देण लाभलेले गाव.दोन बाजुला डोंगर एका बाजुला जंगल वाहणारी नदी.६००-७०० लोकवस्ती असलेले गाव.इथे तसं बघीतले तर सर्व घरे कौलारुच पण काही बड्या लोंकाचे वाडे होते.आरवच्या एका मित्राने त्याला त्याचा ह्या गावात वाडा असल्याचे आणी गावाबद्दल सांगीतले होते. म्हणुनच आरवने हे गाव सुचवले होते.त्याच्या मित्राने सांगीतल्या प्रमाणेच ते गाव सुंदर होते . याची अनुभुती त्या गावात आल्यावर झाली.पण तंत्रज्ञांनाच्या बाबतीत मात्र हे गाव मागे होते .दोन चार घरे सोडली तर कोणाकडेच टि.व्ही.नव्हती . मोबाइल पण साधेच आणी त्यातही रेंज नाही असं हे गाव.
गाडी एका वाड्यासमोर थांबली.कुमार पाठोपाठ सर्वजण खाली उतले.तोच वाड्यातुन रामुकाका धावत आले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले.रामुकाका ह्या वाड्याचे राखणदार होते.४०-४५ वय साधे भोळे त्यांनीच सर्व वाडा स्वछ केला होता .त्यांना तशी पुर्वसुचना होती."मी रामु इकडं राखण करतो' रामु काका.
"हो माहीतिये मला सांगीतलं माझ्या मित्राने " अारव.
"लई टाईम झाला बघा कवापासुन तुमची वाट बघतोय" रामुकाका .
"हो तसा थोडा उशीरचं झाला" कुमार स्मितहास्य करत म्हणाला.
"चला चला सर्वेजण अारम करा मग जेवायला या " रामुकाका.
सर्वजण वड्यात अाले सगळे वाडा निरखुन बघत होते.
कुमार थोडा काळजीत होता .आरोहिच्या ही बाब लक्षात आली .तोपर्यंत रामुकाकांनी सर्वानां खोल्या दाखवल्या.
नीरज आणि हर्ष , आरव आणि कुमार हे त्यांच्या खोलीत गेले . काव्या , आरोही आणि शाल्मली त्यांच्या खोलीत गेले . संध्याकाळचे 7 :00 - 7 :30 वाजले असतील . रामुकाकांनी सर्वाना जेवणाला आवाज दिला . सर्व मुख्य खोलीत आले . जेवणाचा खमंग वास येत होता. त्यामुळे सर्वाना कळकळीत भूक लागली . सर्व जेवणाला बसले . सर्वांनी पोटभरून जेवण केलं . इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते . रामू काका त्यांना गावाच्या गमतीदार किस्से सांगत होते . त्यानंतर ते तिथले चांगले पर्यटक स्थळाची माहिती देत होते .
"काका ईथे एखाद ऐतिहासिक ठिकाण आहे का हो ? " काव्या .
"व्हय हाय की , इथंन 2 तासांवर एक किल्ला हाय बघा लय मोठा हाय " रामू काका
"कोणी बांधला आहे तो किल्ला " हर्ष .
"त्ये कोनालबी माहीत नाय , पण काही लोक म्हणत्यात की शिवाजी महाराजांचा हाय म्हणून पण नीट कुणालाच माहीत नाय " रामू काका .
"कोणाचा पण असो आपण जाऊन येऊ आणि महाराष्ट्र मधला म्हणजे आपल्या राज्यांचाच असेल " नीरज .
"हो बरोबर " आरव .
"बर साहेब म्या जातो यात्रा घरच्याला , बायका पोर वाट बघत असतील . " रामू काका .
"हो काका पण काका आम्हाला इथलं काय जास्त माहीत माहीत नाही तुम्ही येऊ शकता का उद्या आमच्यासोबत ? " आरव .
"मला शेतावर काम हाय तरी म्या माझ्या पोरीला धाडतो तुमच्यसंग " रामू काका
"हो चालेल आम्ही तिलापण घेऊन जाऊ " शाल्मली .
"ठीक हाय भेतू मंग उद्या " रामू काका जाता म्हणाले . रामू काका निघून गेले . परत सर्व एकमेकांची मज्जा घेऊ लागले .
"कुमार तुझ्या कोलकात्याच्या मित्र -मैत्रिणींविषयी सांग जरा आम्हाला पण " हर्ष .
"तू काय करशील त्यांच्या बद्दल जाणून घेऊन " कुमार हर्ष ची मज्जा घेत म्हटला.
" अरे त्याला मैत्रिणीबद्दल ऐकायचं आहे रे " नीरज . नीरज पण हर्ष ची घेत म्हटला . सर्व हसले .
"नाही असं काही नाही मी असच विचारलं " हर्ष आपली बाजू सांभाळत म्हटला .
"असुदे असुदे कळाल आम्हाला " काव्या . सर्व हर्ष ची मज्जा घेत होते . हर्ष पूर्ण फसला होता .
"गप्प बस रे का बिचार्याला त्रास देताय " शाल्मली हर्षच्या बाजू घेऊन म्हणाली .
"बघा ना वहिनी " हर्ष . ( कुमार शाल्मली ला वहिनी म्हणत असल्याने सर्वच तिला वहिनी म्हणायचे ) .
परत थोड्या वेळ सर्वांची अशीच मस्ति चालू होती . सर्वाना खूप मज्जा येत होती . पण तरीपण त्यांना 2 जनाची आठवण येत होती . केयुर आणि स्वातीची . आरव च लक्ष घड्याळ्याकडे गेलं .
"अरे 10 वाजले चला झोप लवकर उद्या लवकर उठून जायचंय फिरायला " आरव . सर्व जरा कंटाळा करताच आत गेले . कुमारने पलंगावर आपलं अंग टेकवल . तेवढ्यात त्याचा फोन वाजला . त्याने फोनकडे पाहिलं . स्क्रीनवर केयुर नाव दिसलं . त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने फोन उचलला आणि कानाशी लावला .
"हॅलो " तिकडून केयुर चा आवाज आला .
"हॅलो , बोल काय करतोय " कुमार .
"पोहचले का रे नीट ? " केयुर .
"हो, तुझी आठवण येते आहे पण " कुमार .
"अरे काय करू यार मीटिंगस आहे खूप , त्यामुळे मला पण लय आठवण येते आहे रे खास करून तुझी " केयुर .
"मला पण खूप दिवस झाले आपण भेटलो नाही . " कुमार .
"कॉलेज मध्ये कसली मज्जा करायचो रे आपण , खूप " केयुर .
"हो ना शाळेत पण किती मस्ती करायचो आपण " कुमार .
कुमार बोलत बोलत बाहेर आला आणि वरती गच्ची वर जाऊ लागला . चॅन थंड हवा होती बाहेर अशी नैसर्गिक थंड हवा तो अनुभवत होता .
बऱ्याच वेळ बोलल्यानंतर कुमारने केयुर ला विचारलं .
"कधी येशील " कुमार .
"अरे नाही सांगत येत तरीपण 3 - 4 दिवस लागतील . " केयुर .
"अच्छा ठीक आहे ये वाट बघतोय तुझी आणि स्वतीची " कुमार .
"हो चाल बाय " केयुर .
"हो बाय " कुमार .
कुमारने फोन ठेवला . त्याला समाधान वाटत होतं .