रक्तनटीका प्रकरण 2

388 4 0
                                    

दुसऱ्या दिवशी सर्व निघतात . आंबेगाव ला जायला . आरव ने कार घेतली . तो कार चालवत होता . त्याच्या बाजूला कुमार बसला होता . मागे शाल्मली , आरोही , काव्या आणि स्वाती बसले होते . त्यांच्या मागे नीरज आणि हर्ष बसले होते . गाडी सुसाट वेगाने जात होती . 

***

5 दिवसांपूर्वी
स्थळ: - आंबेगाव
वेळ :- रात्रीचे 10 -11

काळ्याकभिन्न त्या रात्री खूप जोऱ्यात पाऊस पडत होता . विजांचा कळकळाट होत होता . साधं कुत्र किंवा चिट पाखरू पण रस्त्यावर दिसत नव्हतं . अश्या ह्या भयाण रात्री 2 पोर रस्त्याने जात होती . हातात बॅटरी चालू करून त्या प्रकाशात जात होती .एकाने छत्री हातात धरली होती . दोघे त्या छत्रीत चालत होती . तरीपण थोडेसे भिजलेच होते ते  . कोणती गाडी मदतीला येईल  का अशी आस लावून ते त्या रस्त्याने चालत होते . त्याच्यातल्या एकाला तो वाडा दिसला .
"आर चाल की त्यो बघ याच्यामंदी थांबू थोडया येळ." त्यांच्यातला एक म्हणाला .
"आर नाम्या यळा की खुळा तू आस काय बोलतो , म्या ऐकलंय तिथं हडळ हाय आन ती रातच्याला माणसांना मारते " दुसरा काकुळतीस येऊन म्हणाला
"खुळा म्या नाय तू हाय दिन्या जो ह्या गोष्टींवर इश्वास ठेवटू". नाम्या म्हणाला . त्याच्या ह्या वाक्यवर दिन्या चिडला . त्याने ते काही बोलून दाखवले नाही . ते चालत चालत त्या वाड्यासमोर आले .
"एक नग जाऊ तिकडं लय वंगाळ हाय तिथं " दिन्या .
"गप अन चाल तू बी " नाम्या .
"म्या न्हाय येत तू पण नग जाऊ " दिन्या .
"म्या जातोय तुला यायचं तर ये " नाम्या .
अस म्हणून नाम्या नऊ लागला त्यान मोबाइल मध्ये बघितलं अजून पण नेटवर्क आलं नव्हतं . त्याने चेहरा पाडून मोबाइलला खिश्यात ठेवला . आणि वाड्याच्या आत चालू लागला . त्याची नजर वाड्यावरच्या नावावर गेली त्याने ते नाव वाचाल नाव होतं 'इनामदार वाडा' .  तो प्रवेशदाराजवळ गेला . त्याने हात लावून बघितले . दरवाजा आत लोटला गेला. त्याने आत प्रवेश केला . एक थंड वाऱ्याची झुळूक त्याला स्पर्श करून गेली . तो शहराला . आत मध्ये काहीच दिसत नव्हतं . त्याने मोबाइल बाहेर काढला . त्या टॉर्च मध्ये तो वाडा बघू लागला . वाड्याची ती मोठी , प्रशस्त  खोली म्हणजे त्या काळातील हॉल असावा असा त्याने अंदाज लावला .त्या वाड्याच्या मध्यभागी एक मोठं प्रशस्त झुंबर लटकत होत .  तो पुढे जाऊ लागला . वाड्याच्या थोडं आत वरती जायला 2 जिने होते . एक उजव्या भागाला जाण्यासाठी तर एक डाव्या भागाला जाण्यासाठी . तिथे मध्ये एक मोठी प्रतिमा (फोटो) लागली होती. तो त्याकडे पाहत होता . डोक्यावर फेटा , अंगात राज्यवस्त्र , हातात तलवार , कपाळावर टिळा ,आणि चेहऱयावर ते राजवैभवाचे भाव . दुसऱ्या एका भीतीवर तसेच फोटो लागले होते पण ते फोटो त्या फोटो पेक्षा लहान होते . त्या मध्ये एक स्त्री चा पण फोटो होता .ती  बाई जास्त वयस्कर नव्हती वाटत . तिच्या अंगावर राजवस्त्र हॉटेव. रूपाने खूप सुंदर होती . शरीर एखाद्या अप्सरे सारख होत . तीच रूप बघून कोणाला पण तिचा मोह होईल असं तीच रूप होत . तो सर्व फोटो पाहत होता . एवढ्यात त्याच्या खांद्यावर मागून एक हात आला . तो दचकला .तो देवाच नाव घ्यायला लागला .  त्याचा मोबाईल खाली पडला तो पण खूप घाबरला होता . समोर जे कोणी होत ते हसू लागलं होतं . नाम्या पटकन खाली वाकला . त्याने मोबाइल घेतला व उचलून त्या टॉर्च चा प्रकाश समोरच्या चेहऱयावर टाकला .
"आर तू " नाम्या रागाने म्हणाला .
"वय गाड्या म्या पण तू तर भीत न्हाय ना कुणाला मग मला का एवढा भ्याला ." विन्या . त्याचा खांद्यावर हात ठेवणारी ती व्यक्ती विन्या होती .
"पण तू का आला तू तर घरी गेला व्हता ना " नाम्या .
"आर तू दोस्त हाय माझा आलो बघ " विन्या .
" आसू दे , सांग ना तुजी बी ऐकत जायला फाटते " . नाम्या .
नाम्या बोलून एकटाच हसु लागला . मग ते दोघे वाडा बघण्यात दंग झाले . विन्या च्या वागण्यात थोडा बदल नाम्याला जाणवले . त्या वाड्यात एक तलवार ठेवली होती . लय मोठी होती तलावार . तिच्या मुठीला मखमल लावली होती . त्यावरती एक निशाण होत , तलवारीची पात धारदार होती . तो चालत चालत एक आरश्यासमोर आला .विन्या त्याच्या मागे मागे जात होता .  तो आरसा बघत होता . त्या आराश्यावरची नक्षी तो बघत होता . त्याने स्वतःच प्रतिबिंब तो बघू लागला . एवढ्यात त्याचा फोन वाजला . त्याने फोन न बघताच उचलला .
"आर नाम्या कुठं हाय तू , तुला सांगतो तू गेला आन मागून गाडी भेटली मग म्या आलो गावात " आवाज विण्याचा वाटला . नाम्याची बोबळी वळली . तरीपन त्यानं धीर एकटवून विचारलं.
"कोण हाय " त्याने थरथरत विचारलं .
"आर म्या विन्या हाय " .
हे ऐकून नाम्या च्या डोक्यात मुंग्या आल्या . आत्तापर्यंत कोण होत आपल्याबरोबर हे त्यानं पाहिलं समोर आरश्यात पाहिलं आणि त्याला त्याच्या पाठीमागे एक मुलगी दिसली . तिची मान कापून एका बाजूला झुकलेला तिचा चेहरा . तिचे गंजलेले डोळे , डोक्यातून आलेलं रक्त , सर्व वस्त्र फाटलेले  , असा तिचा अवतार बघून तो जोऱ्यात ओरडला . त्याचा आवाज निघत नव्हता . अचानक तो मागे फेकला गेला . एका भितीवरून दुसऱ्या भिंतीवर तो फेकला जाऊ लागला . तो स्वतःवर बोचकू लागला . तो स्वतःचे केस ओढू लागला . वरती लावलेलं ते झुंबर फिरू लागल . त्याच्या काचा नाम्याच्या अंगात घुसू लागला .  तो एक ठिकाणी पडला . त्याचा समोर एक काळी सावली दिसली . ती काळी सावली त्याच्या जवळ येऊ लागली आणि त्या भीतीने त्याने त्याचा जीव सोडला .
सकाळ झाली . वाड्याबाहेर पोलिसांची गाडी उभी होती .
"शिंदे , बॉडी पोस्टमारटम ला पाठवून द्या " एक तरुण अधिकारी सांगत होता . 
"व्हय साहेब " शिंदे .
"सर मर्डर वाटतोय पण नेहमीप्रमाणे एकपण पुरावा नाही त्यामुळे आत्महत्या च . "  सब इन्स्पेक्टर शिरीष म्हणाला .
"नाही सर तीनच घोट घेतलाय याचा " तिथं असलेला एक हवालदार म्हणाला .
"स्टॉप धिस नॉन सेन्स " इन्स्पेक्टर यश म्हणाला . तो जर चिंतेत होता . करण ह्या घटना कमी होत नव्हत्या आणि ह्या महिन्यातील ही चौथी घटना होती . तो त्याच पडक्या चेहऱ्यात गाडीत बसला . गाडी पोलीस स्टेशन जवळ आली . तो आपल्या केबिन मध्ये गेला . आणि तसाच विचार करू लागला . ज्या प्रकारे हत्या व्हायची त्यानुसार अशी आत्महत्या कोणचं करू शकत नाही आणि एकाच ठिकाणी नाही हे शक्य नाही . पण हा खूप पण नाही कारण तसे पुरावे पण नाही . एकही पुरावा कधीच मिळत नाही .आणि गावकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा म्हटलं तर त्याचा विज्ञान विवेक बुद्धीला ते पटत नाही . असाच तो मनात विचार करत होता . त्याच्या केबिन मध्ये शिंदे हवालदार आले . त्यांनी लगेच यश ची स्थिती जाणली  .
"सर काय काळजीजी करताय  ?"  शिंदे  .
"काही नाही ." यश उसासा टाकत म्हणाला . 
"सर काय बी काळजी करू नका , आई जगत्अंबेच्या कृपेने सर्व नीट होईल " शिंदे यश ला धीर देत म्हणाले.

रक्तनटीकाDonde viven las historias. Descúbrelo ahora