रक्तनटीका:- प्रकरण 5

187 1 0
                                    

गोष्ट पूर्ण झाली होती. सर्व आश्चर्यने पाहत होते . बराच वेळ झाला होता . सर्व गावकरी निघून गेले . सर्वांनी जेवण केलं . आज नेहमी होणारी मस्ती नव्हती , आरडाओरडा नव्हता ,चिडवचिडवी नव्हती . सर्व झोपायला निघून गेले . दिवसभर केलेल्या मस्तीमुळे रात्री सर्वाना झोप आली . पण कुमार आणि आरावला झोप येत नव्हती . रात्री एक आवाज आला आरावने घड्याळाकडे पाहिलं रात्रीचा एक वाजला होता . त्याने कुमारकडे पाहिलं तो तिथे नव्हता . तो लगेच उठला आणि खोलीच्या बाहेर आला . त्याला वाड्याचा मुख्य दरवाजा उघडा दिसला . तो बाहेर आला कार नव्हती . त्याला समजलं काय झालं . भावाची काळजी म्हणून तो पण धावत सुटला इनामदार वाड्याकडे वाडा कसला महालाच होता तो . आरव त्या द्वारासमोर आला . आतमध्ये एका बाजूला कार लागली होती . त्याने नीरज ला फोन केला आणि तिथे यायला सांगितलं . नीरज , हर्ष पण निघाले . आरव महालात शिरला . कुमार कुठेच दिसत नव्हता . तो वर जाऊ लागला . ती अतिशय गारवा होता . आरव चालत असताना कोणीतरी आपल्या मागे चालतय अस त्याला जाणवलं . त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कोणचं नव्हत . तो त्या जिन्याने पुढे जाऊ लागला . आतमध्ये एक भयानक हास्य येऊ लागलं . तो थोडा पुढे गेला त्याला एक प्रतिमा दिसली . खूप मोठी होती ती प्रतिमा . त्याने मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्या व्यक्तीचा चेहरा पहिला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याचे डोळे विस्फारले . तो चढुन वर आला होता . एक खोलीचे दार उघडले गेले . तो त्या खोलीकडे जाऊ लागला . "दादा वाचावं , वाचावं मला " त्याला कुमारचा आवाज आला . तो दुसरीकडून येत होता ." कुमार कुठे आहेस तू , मी आलोय घाबरू नको " आरव ओरडतच म्हणाला . त्याचा आवाज कापरा झाला होता . एक सफेद आकृती त्याच्या समोर आली . तो काही करणार इतक्यात त्याच शरीर जड होऊ लागला . तो एक ठिकाणी थबकला . तो उडून त्या खोलीत पडला . खोलीचे दार बंद झाले . त्याचा मोबाइल पण पडला . आता सर्व बाजूला अंधार होता . तोच दोन लाल डोळे त्याच्या दिशेने रोखलेले त्याला दिसले . तो घाबरला . "मी नाय सोडणार त्याला , तो माझ्या प्रेमाच्या आड आला हाय त्याला नाय सोडणार मी " एक आवाज त्या खोलीमध्ये घुमला आणि नंतर हसायचं आवाज येऊ लागला . आणि आरव च्या डोक्यात कश्यानेतरी मार लागला . तो बेशुद्ध होऊन पडला .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: May 15, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

रक्तनटीकाWhere stories live. Discover now