टिंग टॉंग दाराची बेल वाजली तशी शाल्मली दरवाजा उघडायला गेली तिने दरवाजा उघडला बाहेर कुमार उभा होता, ती त्याला बघून ती आश्चर्यचकित झाली .तिला आनंद झाला "अरे कुमार ये तू असा अचानक कसा काय आलास काळवायच तरी "शाल्मली कुमार ला म्हणाली,. "हो हो संगतो कंपनीला सुट्टी आहे 15 दिवसांची म्हणून म्हटलं सरप्राईज देऊ तुम्हाला आणि मग आलो "कुमार शाल्मली ला सांगितलं. "पण वहिनी दादा कुठे आहे ?"कुमारने शाल्मली ला विचारल.
"ते अजून झोपले आहेत ,तू बस ते उठतील इतक्यात आणि आज काय बेत बनवू स्पेशल तू जे सांगशील ते बनवते "."आता मस्त श्रीखंड पुरी करा आणि रात्री आपण हॉटेल मध्ये जाऊ ".शाल्मली लगेच कमला लागली." अरे कुमार" कुमारला मागून आवाज आला त्याने बघितलं आणि लगेच उठून त्याला मिठी मारली दादा कुमार खूप आनंदला" अरे तू असा अचानक ईथे कसा काय ?" आरव .
"अरे दादा कंपनीला सुट्टी आहे 15 दिवसांची मग म्हटलं जाऊन भेटून येऊ "कुमार .
"खरच खूप छान काम केलस "आरव.
"चला ब्रेकफास्ट रेडी आहे "शाल्मली चा आवाज आला ,
"जा तू ये फ्रेश होऊन मग आपण निवांत बोलू "आरव.***
कुमार व त्याचा दादा म्हणजे आरव . आरव ची बायको म्हणजे शाल्मली . कुमार हा एका it कंपनी कंपनी मध्ये जॉब ला होता . त्याच्या प्रोफेशन मुळे त्याला वेळ खूप कमी मिळत असे . कुमार स्वभावाने साधा सरळ मुलगा . त्याचा गौर वर्ण , काळेशार केस , निळे बुबुळ , पिळदार शरीरयष्टी, उंच, त्याच्या गालावर पडणारी खळी , त्याच्या या गुणांमुळे तो एका सिनेमातल्या नायकासारखाच दिसायचा .कुमारच्या कपाळावर एक जखम होती एक विशिष्ट प्रकारची त्याने त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला उत्तर मिळाले नाही .आरव हा पोलिस खात्यात पोलीस अधिकारी होता . आरव सुद्धा स्वभावाने खूप चांगला होता . सर्वाना मदत करणारा , हुशार , समजून घेणारा , असा होता आरव . शाल्मली पण त्याचा सारखीच . शाल्मली स्वभावाने चांगली सोज्वळ मुलगी , सुंदर , मदतीला धावून जाणारी अशी होती . तीच आणि आरव एकमेकांनवर खूप प्रेम होतं . आणि लवकरच त्या प्रेमच प्रतीक येणार होत .