दिवस जात होते. स्वरालीचा संसार बहरत चालला होता. स्वरालीने आता वेळेचा नीट पण व्यय व्हावा आणि नुसत्याच व्यभिचारी प्रकारांना बळी पडू नये म्हणून स्वतःला सामाजिक गोष्टींमध्ये गुंतवले होते. तिने ओळखी वाढवल्या. मैत्रिणी जमवल्या. किट्टी पार्टीज, पिकनिक वैगरेमध्ये तिला रुची वाढू लागली. तिच्या सौंदर्य आणि प्रेमळ वागण्यानं तिच्या सोबत असणाऱ्या सर्वच स्त्रियांना तिचा सहवास आवडू लागला. काही काही वेळा अशा येत होत्या, जिथे तिला वाटत होते कि समोरच्याला सामील व्हावे. पण मयूरच्या प्रकरणापासुन तिने जरा ब्रेकचं घेतला होता. गुरणामची आठवण मध्ये मध्ये यायची पण तो परत येण्याची आशा जवळ जवळ संपुष्टात आली होती.
आता जमाना स्मार्ट फोन्सचा आला होता. स्वरालीला त्यासाठी महेशच्या मागेही लागावे लागले नाही. त्याच्या लाडक्या बायकोला त्याने चांगला महागडा फोन तिच्या वाढदिवशी गिफ्ट केला. त्यावरील मेसेंजर अँप ने सध्या लोकांना आकर्षित केले होते. सोशल मीडिया साईट्सने सुद्धा तिला भुरळ घातली. तिच्या जुन्या नव्या मैत्रिणी, नातेवाईक ह्या अँप ने जवळ आले. स्वरालीचे दिवस सर्वांशी ऑनलाईन चॅट करण्यात जाऊ लागले. त्यांचे ग्रुप्स बनले घरातल्या गोष्टींचे विषय स्टेटस म्हणून टाकले जाऊ लागले. लाईक्स कॉमेन्स्ट्स आणि शेअर ने एकमेकांमध्ये चढाओढ निर्माण केली. पर्सनल चॅट्सने गॉसिपिंगला उधाण आणले. अशा अँप्सने मनुष्याला एक स्वतंत्र असा अंधारलेला कोपरा दिला. खूप सारे लोक मनात दाबून ठेवलेल्या भावनांना अशा माध्यमाद्वारे वाट करून देऊ लागले. नवीन गोष्टींची आणि विविधतेची आवड असलेल्या स्वरालीला ह्या प्रकारांचे चांगलेच कुतूहल निर्माण झाले. तिने सोशल साईटवर तयार केलेल्या स्वतःच्या प्रोफाईलवर, तिच्या फोटोंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागला. त्यातच अपरिचित व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट तिला दिसू लागल्या. तिला समजले कि सौंदर्याच्या मागे आकर्षित होऊन येणारे भुंगे तिच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहत आहेत. अशाना हाताळण्याची खास पद्धत म्हणजे दुर्लक्ष करणे. ते तिने केले.