भाग - ४
स्वरालीचे खरे वैवाहीक आयूष्य त्यानंतर सूरु झाले. प्राजक्ताच्या बहरासारखी स्वराली जेव्हा सकाळी ताजीतवानी होऊन घरात व्यग्र असे, तेव्हा तीच्या सूगंधी अस्तित्वानेच प्रत्येक सदस्य आनंदी होत असे. सदा हसमूख आणि खेळकर वृत्तीच्या स्वरालीने सर्वांचीच मने जिंकली. स्वयंपाकात निष्णात अन्नपूर्णा आणि शय्येत रंभा असलेल्या स्वरालीने महेशचे पूर्ण आयूष्य व्यापले. त्याला तिच्याकडून सर्व सूख मिळत होते. तो देखिल तीला आनंदी ठेवत होता. फक्त तो तीच्याकडे जास्त व्यक्त होत नसे. स्वराली मात्र खूप बडबडी असल्यामूळे सतत छोट्या मोठ्या गोष्टींनी त्याच्याशी संवाद साधत. महेशला खरेतर तीचे बडबड करणे मनापासून आवडत होते.
अपत्याची दोघांनाही घाई नसल्यामूळे त्यांनी मनसोक्त हिंडून फिरून घेतले. लेटेस्ट गोष्टींची आवड असलेल्या स्वरालीला शहरातले वातावरण चांगले मानवले. तिच्यात अमूलाग्र बदल झाला. तिचे राहणीमान बदलले. तीचे कपाट नवीन प्रकारच्या ड्रेसेसने भरून गेले. सूडौल आणि सूंदर स्वराली महेशसोबत बाहेर पडली की समोरून येणारे स्री पूरुष तीच्याकडे पाहात राहात असे तीचे व्यक्तीमत्व होते. गावाकडची कात टाकून स्वराली जास्त स्टायलीश झाली. ह्या गोष्टींमधे तीचे वाढलेले ज्ञान वाखणण्याजोगे होते. तीच्या मूळच्या रूपात अजून भर पडली. आजूबाजूला असणारे बरेचसे पूरुष तीला पाहून हरखून जात. स्वरालीला तिकडे लक्ष द्यायला वेळ आणि गरज दोन्ही नव्हते. महेश आणि तिचे कूटूंब एवढेच तीचे आयूष्य होते.
एक गोष्ट आणखी घडली. ती म्हणजे महेशने बिझनेसच्या विस्तारासाठी आणखी एक शाखा ऊघडली. आता त्याला त्यासाठी भरपूर वेळ देणे गरजेचे होते. म्हणून मग ब्रांचच्या जवळच तो आणि स्वराली राहण्यासाठी गेले. एकत्र कूटूंबामधे राहण्याची सवय असलेल्या स्वरालीला हा बदल थोडा जड गेला. त्यातून काही दिवसांनी ती प्रेग्नंट राहीली. ते दोघे शहराच्या दूसर्या टोकाला राहात होते तरीपण घरच्यांचे येणे जाणे होतेच. माहेरी जाऊन स्वरालीचे बाळंतपण रितसर झाले. तीने एका स्वतःच्याच छबीला जन्माला घातले. अतिशय गोड अशी परी महेश आणि स्वरालीच्या आयूष्यात आली. स्वराली तीच्या लेकीच्या संगोपणात बूडून गेली. आता तीला स्वतःचा पण विसर पडला होता. परी,महेश आणि घराचा सांभाळ एवढेच तीचे आयूष्य होते. महेश आधीसारखीच तीची काळजी घेत होता. पण संवाद मात्र अजूनही यथातथाच होता. स्वराली आता एका मूलीची आई झाली होती. लग्नाच्या वेळी सूडौल असलेली तीची चण आता चांगलीच भरलेली होती. सगळी सौंदर्य स्थळे मापात अजून वाढली होती. पाहणारा तीच्या सौंदर्याकडे पाहातच राहात असे. ती सूंदर होती पण तीच्या नजरेत सध्या कामभावना इतक्या प्रखर नव्हत्या. महेश तीला व्यवस्थित समाधानी ठेवत होता.