पुस्तक समीक्षा...

86 0 0
                                    

पहायला गेलं तर लेखन ही एक कला आहे. पण ती सर्वांनाच जमेल असे नाही. कारण, शब्दांचा हा खजिना शिंपल्यांच्या स्वरूपात समुद्रात विखुरलेला तर असतोच फक्त त्या शिंपल्यांना गोळा करून अचूक त्या मोत्याला योग्य त्या ठिकाणी गुंफून केवळ त्याची माळच तयार न करता त्यात भावना ओतन 'मनालाच नव्हे तर मेंदूलाही तृप्त करण' हे काम फक्त एका नावीन्यपूर्ण लेखकालाच जमू शकते.

माणसांमधले नाते म्हणले की रक्ताच नातं असतं; कधी कधी मैत्रीचं नातंही असतं पण विचारांचं नातं म्हणलं की एखाद्या उत्कंठ, रंजक आणि गमतीशीर पुस्तकाचे अजून एक पान वाचत राहावं तसे नवीन-नवीन विषयांची चित्तवेधक मुळे पाण्याच्या शोधात थांबतच नसतात.
वेळेचं... वेळेचं तर विचारूच नका घड्याळाचे काटे तर अक्षरशः त्या विचारांना खुणावून खुणावून थकूनच जात असतील.
ही होती विचारांच्या नात्यातील एक छोटीशी गुंफण...

'मी गुरुजी झालो त्याची गोष्ट' या रचनेचे शिल्पकार, आपल्या सर्वांचे विचार मित्र, नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य सजवणारे, आपल्या विचारांची पेटी व अनुभवांचा खजिना इतरांना वाटत वाटत केलेल्या प्रवासाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणारे श्री राजेंद्र भाग्यवंत गुरुजी यांच्या प्रवासाची ही गोष्ट. जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा त्यांच्या प्रवासाला ही दोन बाजू आहेत बर का मित्रांनो...

म्हणायचं उद्देश असा की तुम्ही मूळचे एका दुष्काळी प्रदेशाची निवासी परंतु इंद्राचा आशीर्वाद असलेल्या दुसऱ्या निसर्गाचे रहिवासी. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम मिळालेल्या गावात प्रचंड पाऊस असायचा आणि जेथे पाऊस देवता प्रसन्न असेल तेथे निसर्ग देवताची काय उनी...

निसर्गाचा ठेवा, हिरवाईचा बहार, वनांचा खजिना अन बरच काही...
पूर्ण पावसाचा उतारा केल्यावर मला वाटते सह्याद्रीचे निम्मे ढग तर तुमच्यावरच कोसळत असतील. माझा हा अंदाजपंचे बाण अगदी निशाणा साधल्यासारखं वाटतंय मला...?

पुस्तकातील हा प्रवास तर एका स्वतंत्र माणसाचा आहे पण एकजुटीने किती अशक्य कामे शक्य मुक्कामाचे शिखर गाठू शकतात हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने आपण या पुस्तकातून आत्मसात करायला हवा. त्यानंतर माणुसकी आणि आपलेपणाने आपण परक्या लोकांनाही आपलेसे करू शकतो. अशा अनेक प्रसंगांची अभिव्यक्ती आपण या पुस्तकात अनुभवू .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jun 06, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मी गुरुजी झालो त्याची गोष्टWhere stories live. Discover now