त्या थेरड्या कडून आम्ही बाहेर पडलो तेंव्हा चागलीच रात्र झाली होती. ती एक गळुन गेलेली, थकलेली, असाह्य अशी अबला दिसत होती. आता पटल की स्रीने कितीही गमजा केल्या तरी पुरुषा पुढे ती लाचार होतेच.
कालची वाघीण आत्तातरी बकरी दिसत होती. मी हलकेच तिचा हात पकडला ना तिने विरोध केला ना रिस्पाँन्स. जणू ती कुठंतरी हरवली होती. आम्ही पायवाट तुडवत बंगल्यावर आलो. रात्र झाली होती. रातकीड्यांचा किर्र आवाज, मधुनच एखादा फडफडणारा पक्षी किंवा कुत्र्याच भुंकण कानी पडत होतं.
नोकराने दार उघडल. ती तिरा सारखी तिच्या खोलीत गेली. मी ही माझ्या खोलीत आलो. वाॅशरुममध्ये जाऊन फ्रेश झालो. सिगारेट पेटवली पण का कुणास ठावूक पण पुन्हा विझवली. उठलो तिच्या खोलीकडे गेलो. दार उघडेच होते. ती बेडवर अस्ताव्यस्त पडली होती. मी शेजारी जाऊन बसलो. मला तिची खुप दया आली. तिच्या चेहऱ्या वरुन पाठीवरुन हात फिरवायला लागलो. ती कळवळली. माझ्या जवळ सरकून मला बिलगली आणि ओक्साबोक्शी रडु लागली. मी तिला आणखी जवळ घेतले. तिच्या शरीरावर हात फिरवू लागलो आणि अश्चर्याचा धक्काच बसला. मी हळुहळु तीचे कपडे काढले. तिच्या सर्वांगावर चावल्याच्या आणि रक्त साखळल्याच्या खुणा होत्या.
मी चिडलो हे काय आहे? कोण तो थेरडा आणि तुझी अशी हालत होत असताना तु गप्प का बसलीस? स्वत:ला वाघीण, विषकन्या समजतेस मग हे काय?
कदाचीत आयुष्यात आपलेपणाने बोलणारा मीच पहिला भेटला असावा. तिने सर्वस्व पणे स्वत:ला माझ्यावर सोपविले. मी ऊठलो बाथरुममधुन गरमपाणी व टाॅवेल आणला तिचे सर्वांग पुसुन काढले अगदी गुप्तांगासकट. तिथे ही जखमा होत्या. एखाद्या वखवखलेल्या श्वापदाने लचके काढावेत काहीशी तशीच परिस्थीती होती.
माझे आवडते औषध कैलास जीवन माझ्या बॅगेत होते. ते मी घेऊन आलो सर्व जखमांवर हळुवार पणे लावले. पावडर लावली. तिचे कपाट उघडले एक नाइट ड्रेस अगदी पातळ हलका असा काढला. तिला चढवू लागलो. ती थांब म्हणाली. तिला वाॅशरुम मध्ये जायचे होते. ती जाऊन आली मग ड्रेस चढवला. मी बाहेर गेलो. किचनमध्ये सुप करायला सांगितले. बाहेरच्या बार मधुन व्हीस्की सोडा व ग्लास घेऊन आलो. दोन पेग तयार केले. सिगरेट पेटवली. एक तिला दिली एक मला. ती बरीच सावध झाली होती. नेहमी प्रमाणे मोठा झुरका मारला अगदी ठसका लागे पर्यंत. मी तिच्या पाठीवरुन अलगद हात फिरवला. ठसका थांबला. तीच्या हातात ग्लास देऊन चिअर्स केले.