गाडीने वेग घेतला. दिड तासातच कोल्हापुरला पोचलो. तिने हाॅटेलचा पत्ता सांगितला. ति सांगेल तशी मी गाडी वळवत होतो. एका अलिशान हाॅेटेलच्या पोर्चमध्ये मी गाडी उभी केली. दार उघडायला आणि सर मी गाडी पार्क करतो म्हणायला एकजण उभा होता. मी ऐटीत उतरलो. डीकी आतून अनलाॅक केली. ती डीकीच्या इथे होती. बरोबरच्या माणसाला डीकीतून सामान काढताना जातीन लक्ष देत होती. मला पुन्हा अश्चर्याचा धक्का बसला. डिकीतून निळ्या कलरच्या सेम टु सेम सुटकेसेस बाहेर काढल्या होत्या शिवाय एक एअऱ बॅग होती.
ते काढुन झाल्यावर माझा हात पकडुन कमाॅन डार्लींग म्हणून तिने मला रिसेप्शनकडे नेले. सर्व फार्म्यालिटी तिनेच पूर्णकेल्या मग आम्ही रुमकडे निघालो. रुम कसली अलिशान सुटच होता तो. एरवी कुठच्यातरी लाॅजमध्ये सिंगलरुम मध्ये रहाणारा मी पण आज. . .
माझ मलाच हसु आलं. मी हसताना बघुन ती म्हणाली, डीयर तु का हसलास?
काही नाही पण मला देवी समोर कापायला सजवून नेल्या जाणाऱ्या बकरीची आठवण आली. वाटल कुठला तरी नवस फेडायला तु आली आहेस आणि मी बरोबर कापायला आणलेला बकरा आहे. . .
तिने एक जोरदार चिमटा मला काढला. डियर ही तुझी जिवघेणी चेष्टा आहे. तुझ्या मनात असे विचार आलेतरी कसे?
काही नाही ग मी गंमत केली. इतक्या सिरियसली नको घेऊ. आणि तुला माहिती आहे की मी आगापीछा नसेला एक सर्वसामान्यातील सामान्य माणूस आहे. आता तुझ्यामुळे कदाची करोडोपती होईन. हो की नाही?
हो वत्सा मला निट साथ दिलीस तर नक्की होशील. एक मात्र लक्षात ठेव मला पाहीजे तेंव्हा मी तुझ्याकडून शरीर सुख घेईन पण मला बायको वगैरे बनवायची थोडी ही आपेक्षा ठेवू नकोस. ओके चलो नाऊ वुई स्टार्ट टु एंजाॅय आवर फ्रेंडशिप.
तो सबंध दिवस मी तिचा यार होतो. तिने मला भरभरुन सुख का काय म्हणतात ते दिले. संध्याकाळी आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडलो. एक लाँग ड्राइव्ह केला. येताना तिने एका ठीकाणी गाडी ऊभी करायला सांगितली. तो रस्ता आणि ती जागा सुध्दा निर्मनुष्य होती. बऱ्यापैकी अंधार पडला होता. आजुबाजुला घनदाट झाडी होती. एक विचित्र असे वातावरण आहे असे मला वाटले. अर्थात असे वातावरण कधी ना कधी मी अनुभवले होते. माझा व्यवसायच तो असा असल्यामुळे . . .