सूचना/संज्ञा:
© AVINASH (Avinash_Writes) २०२४ सर्व हक्क राखीव.
लेखकाच्या लेखी पूर्व अनुमतीशिवाय या पुस्तकाचा कोणताही भाग पुनरुत्पादन किंवा प्रसारित केला जाऊ शकत नाही, इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक असो, फोटोकॉपी, रेकॉर्डिंग किंवा कोणत्याही माहिती साठवण आणि पुनर्प्राप्ती प्रणालीद्वारे, एखाद्या पुनरावलोकनात थोड्या उताऱ्यांचा समावेश वगळता.
हे कल्पनेचे कार्य आहे. नावे, पात्रे, ठिकाणे आणि घटना ही लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेली आहेत किंवा काल्पनिकरीत्या वापरली आहेत आणि प्रत्यक्ष व्यक्ती, जिवंत किंवा मृत, व्यावसायिक संस्था, घटना किंवा ठिकाणांशी असलेली कोणतीही साम्यता पूर्णपणे योगायोगिक आहे.
"मालकीण बाई" हे लेखन फक्त वॉटपॅडवर (Wattpad) प्रकाशित झाले आहे. या कामाचे अनधिकृत पुनरुत्पादन, वितरण किंवा प्रदर्शन वॉटपॅड प्लॅटफॉर्मच्या बाहेर प्रतिबंधित आहे.
----------------------------------------------------------------------
कथेची सुरवात:
सुगीचे दिवस जवळ आले होते. सगळीकडे पीक काढणीची लगबग चालू होती. बाया बापडे शेताकडे सकाळीच कूच करत होते. दिवस माथ्यावर यायच्या आत काम झालेले बर असत आणि दुपारच्याला थोडी विश्रांती पण करता येते असा बेत लोकांचा असायचा. मालती जरी पाटलांच्या घरची सून असली तरी सुद्धा याला अपवाद नव्हती. भले ती कार मधून जात होती, भले ती प्रत्यक्षपणे शेतात काम नव्हती करणार पण तिला सुद्धा आता शेतमजुरांसोबत दिवस काढायचा होता.
मजुरांना कामाला लावून तिला पीक काढणी करून घ्यायची होती. गेले एक वर्ष तिने खूप कष्ट घेतले होते. मळ्याची सगळी जबाबदारी तिच्यावर होती. सुगीचे दिवस म्हणजे केलेल्या कष्टाचे फळ घरी घेऊन जाण्याचे दिवस. मालती तिच्या कार मधून जात असताना नजर जाईल तिथपर्यंत तिने आपल्या मेहनतीने फुलवलेल्या मळ्याकडे अभिमानाने बघत होती. तिला याचाही सार्थ अभिमान होता कि ती कितीतरी मजुरांच्या हाताला काम देऊन त्यांच्या कुटुंबाला मदत करत होती. पिढ्यान पिढ्या पाटलांच्या मळ्यात काम करणारी कितीतरी कुटुंबे होती.