प्राजक्ताने माप ओलांडलं आणि मनातील धाकधूक लपवत आणि चेहऱ्यावर उसनं हास्य आणत तिने आपल्या घरात पाहिलं पाऊल ठेवलं. लग्न ठरल्यापासून तिच्या मनात हीच धाकधूक होती. लावण्याची खाण आणि मदनीय देहाची मालकीण असलेल्या प्राजक्ताने प्रसादला होकार का दिला हेच बऱ्याच जणांसाठी एक कोडं होतं. जेव्हा प्रसादकडची माणसं बघायला आली तेव्हा तिला कळलं होतं कि, एक आत्या सोडली तर प्रसादच्या कुटुंबात बाईमाणूस नव्हतं. त्या आत्याचंसुद्धा लग्न झाल्यामुळे ती प्रसादच्या घरात राहत नव्हती, तर त्याच उपनगरातल्या दुसऱ्या भागात राहत होती. एक लग्न न झालेला प्रसादचा मोठा भाऊ आणि विधुर सासरे हेच प्राजक्ताचं आता कुटुंब होतं. तिच्या दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन वडील आणि मवाली भावापासून सुटका व्हावी म्हणूनच तिने हा मार्ग निवडला होता. तसं पाहिलं तर फक्त पुरुष असलेल्या घरात राहायचा तिला अनुभव होता कारण तिची आई ती लहान असतानाच वारली होती. पण कसेहि असले तरी ती तिच्या वडील आणि भावाबरोबर राहत होती. त्यांच्याबरोबर राहणं आणि अनोळखी तीन माणसांसोबत राहणं यात खूप फरक होता. तिला त्यांच्याशी जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. तशी ती हुशार, शिक्षित आणि कर्ती सवरती होती. फ्रंटडेस्कच्या तिच्या नोकरीमुळे तिच्या स्वभावात चटपटीतपणा आला होता. शिवाय तिच्या शॉर्ट स्कर्ट आणि तंग फॉर्मल शर्टच्या वेशात तिच्या सडसडीत आणि यौग्य वळणं असलेल्या अंगाकडे बघणाऱ्या आसुसलेल्या नजरांची तिला सवय होती.
प्रसाद एका खाजगी इंजिनिअरिंग फर्ममध्ये सेल्स इंजिनिअर होता. किंचित अबोल, थोडासा बुजरा आणि वडिलांच्या धाकात असणारा मुलगा होता. शिवाय त्यांच्या घरात कोणालाच अमली पदार्थांचं व्यसन नव्हतं. पण प्रसंगविशेष ते सर्व मद्याचा आस्वाद मात्र घेत असतपण ते खूपच नैमित्तिक असे आणि तेही तिच्या सासरकडच्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं होतं. हे सर्व पाहूनच तिने लग्नाला होकार दिला होता.
लग्नापूर्वी प्राजक्ता प्रसादला एक दोनदा भेटली होती. प्रसादच्या लाजाळू आणि भिडस्त स्वभावाची तिला तेव्हा गम्मत वाटली होती. पण आज ती तिचे सासरे आणि दीर याना पहिल्यांदाच भेटत होती. त्या दोघांचाही स्वभाव प्रसादच्या अगदी विरुद्ध होता. बोलघेवडे, आपल्या मतांसाठी आग्रही आणि किंचित आक्रमक असं दोघांचं व्यक्तिमत्व होतं. तिचा दीर, प्रकाश सहा फूट उंच, मजबूत बांध्याचा आणि राकट चेहऱ्याचा होता. त्याच्याकडे पाहून हा एक पोलीस आहे हे कोणीही ओळखू शकलं असतं. तिचे सासरे रिटायर्ड आर्मी मॅन होते. सफेद केस, रापलेला काळसर वर्ण, जाड ओठ यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व किंचित भीतीदायक झालं होतं. याउलट प्रसाद मात्र किरकोळ शरीरयष्टीचा आणि साधारण उंचीचा होता.
YOU ARE READING
प्राजक्ता
Romanceकथेतील पात्रांची, ठिकाणांची नावं, परस्पर संबंध आणि इतर घटना काल्पनिक असून याचा प्रत्यक्षात कोणाही व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.