प्राजक्ताला आणि प्रकाशला आता थोडा वेळ झोप हवी होती. दोघेही प्रकाशाच्या बेडरूममध्ये जात एकमेकांच्या बाहुपाशात विसावले. प्राजक्ता जरी अलार्म लावायला विसरली नव्हती तरी थोड्या वेळाने जेव्हा तिला जाग आली तेव्हा उजाडलं होतं. ती लगबगीने आपल्या रूममध्ये गेली आणि तिने आन्हिक आवरत न्याहारीची तयारी सुरु केली. तिने जरी स्वतःला कामात बुडवून घेतले असले तरीही राहून राहून रात्रीच्या शृंगारिक आठवणींनी ती मोहरून उठत होती. तिच्या अंगावर नकळत काटा फुलत होता. फुल कॉलरचा गाऊन घालत तिने जरी आपले लव्ह बाइट्स लपवले असले तरीही त्यांचा डंख तिच्या काळजात सुखद संवेदना निर्माण करत होता. इतक्यात तिला तिच्या कमरेवर कोणाची तरी पकड जाणवली आणि त्यापाठोपाठ तिच्या न्हालेल्या केसांमधून तिचा गंध हुंगत असल्याची जाणीव. तिने प्रयत्नपूर्वक प्रकाशला दूर लोटलं आणि दबत्या आवाजात म्हणाली "मामंजी उठलेत". प्रकाश हिरमुसला होत बाहेर आला तिने न्याहारीची तयारी केली आणि सर्व जिन्नस बाहेर टेबलवर आणून ठेवले. रंगराव अगोदरच बाहेर येऊन बसले होते. नाश्ता आटोपून ते बाहेर फेरफटका मारायला गेले. प्राजक्ताने आता बोलायला सुरुवात केली. "प्रकाशजी, आपण आपल्या नात्याला काय नाव द्यावं?" प्रकाशने तिच्या बोलण्यातला गंभीरपणा जोखला आणि तो म्हणाला, "हे नातं जगातलं सर्वात प्राचीन नातं आहे. नर आणि मादीचं. मी फक्त हे एकच नातं मानतो. आता तू जर या समाजाची, आसपासच्या लोकांची मानसिकता विचारात घेतलीस तर हे नातं अपवित्र आहे पण माझ्या लेखी हेच सर्वात खरं नातं आहे. जर तुला आपल्या नात्याला न्याय द्यायचा असेल तर आपण कधीही लग्न करू शकतो पण मग तुझा समाज या नात्याला स्वीकारेल?" प्राजक्ताने हा विचारच केला नव्हता. प्रकाशाचं म्हणणं खरं होतं. नात्याच्या गुंतागुंतीपेक्षा निर्भेळ शरीरसुख हेच सत्य होतं. प्राजक्ताने प्रश्न केला, "मग जर मी दुसऱ्या कुठल्या पुरुषासोबत संग केला तर? तुम्हाला काय वाटेल?" प्रकाशने क्षणाचाही वेळ न लावता उत्तर दिलं, "जर तुला आनंद मिळत असेल तर मला आनंदच होईल." प्राजक्ता यावर काहीच बोलली नाही. प्रकाशसुद्धा काहीच न बोलता यावरून निघून गेला.
YOU ARE READING
प्राजक्ता
Romanceकथेतील पात्रांची, ठिकाणांची नावं, परस्पर संबंध आणि इतर घटना काल्पनिक असून याचा प्रत्यक्षात कोणाही व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.