सुप्रिया

46 1 0
                                    

काशी...(राजकुमारी भानुमतीचे स्वयंवर)

सुप्रिया ..."राजकुमारी..राजकुमारी...बाहेर समग्र आर्यव्रतातून राजकुमार आले आहे... समग्र नगरी सजली आहे अगदी तुज़्या सारखी.."

भनुमति..."सुप्रिये,राजकुमार आलेत ते ठिक पण त्यापैकी माझ्या योग्य कोन ते सांगु शकतेस..."

सुप्रिया.."हं...याचा विचार तर तुलाच करा लागेल मी फक्त उपस्तीत कुमारन्चे नाव नी कूळ सांगु शकते.."

(स्वयंवर मंडपात)
   अनेक देशातील राजे राजकुमार उपस्तीत होते..भानुमती एक एक पाऊले टाकित प्रत्येक रजा पुढे उभी रहात सुप्रिया त्या राजाबद्द्ल तिला सांगत...असेच ती हस्तिनपुर च्या राजकुमार दुर्योधनाच्या पुठे उभी राहिली त्यांना मागे टाकत ती पुठे वळली तेच दुर्योधनाने तिचा हात पकडला नी तिला खांदयावर टाकुन तिला सभा बाहेरनेण्याचा प्रयन्त केला...बाकी राजे हे फक्त बघत होते काशी नरेश नी आपल्या सैनिकांना आदेश दिला तोच कर्ण सभेत आपला विजय धनुश घेउन उभा राहिला...त्याच्या बाणां पुठे कोणाचीही चालली नाही...
सुप्रिया दुर्योधनाला अडवण्याचा प्रयत्न करित होती पण तो व्यर्थ होता...त्याने भानुमती समेत तिलाही रथात बसविले नी हस्तिनपूर च्या दिशेला निघाला...
    कर्ण सगळ्या राजकुमाराना हरवून हस्तिनपूरी आला...राजकुमारी समवेत तिच्या मैत्रिणी चे हरण झाले हे त्याला कळले...ती कन्या सुत कळतील होती आता तिचे काय करावे हा प्रश्न पडला होता...

दुर्योधनानी राजकुमारीचे अपहरन  केले ही बाब पितामह भीष्म यांना पटली नव्हती पण आता काही करण्याचा अर्थ उरला नव्ह्ता...राजकुमारी भानुमतीचा पण काही तोच विचार होता ...काशी च्या राजकुमारिन्न्ना हरण करुन आणणे ही हस्तिनापुरा ची प्रथाच...
पण तिला काळजी होती ती सुप्रियाची...शेवटी जो पर्यंत अंगराज कर्ण सुप्रियेला पत्नी म्हणून स्विकार करित नाही... मी दुर्योधनाशी विवाह करणार नाही अशी अट तिने घातली... कर्णाला आपल्या मित्रा साठी सुप्रियेचा स्विकार करवा लागला...दोन्ही शुभकार्ये एकाच मांडवात संपन्न झाली.

  (सुप्रिया जुन्या गोष्टीत रममाण झाली होती...तिला ठाऊक होते जर तिचे पाणी ग्रहण कर्णाने केले नस्ते तर ...नाही हा विचार पण तिला करायचा नव्हता...)

वृषाली..."सुप्रिये ..अग कुठे हरवली..."

सुप्रिया..."ताई ... हे माझे नाही भानु चे विचार आहे तिला वाट्टे की युवराज द्रौपदीचे पण हरण करतील नी ती सुंदरी तिची सवत बनेल..."

वृषाली...(हसत) "अग तिला सांग सवत नेहमी वाईट नसते ती केव्ह्या  मैत्रिण बनते हे कळत देखील नाही"
(सुप्रियेचा हात हाती घेत वृषालीने तिला जवल बसविले)

सुप्रिया.."ताई... ही गोष्ट भानु सोबत होणार का ते सांगु शकत नाही?ती स्वतः खुप अभिमानी आहे ,नी पांचाली बद्द्द्ल तर समग्र आर्यव्रतात चर्चा सुरु आहे ...तिच्या सौंदर्याची...तिच्या दिव्य जन्माची...आणि त्या आकाशवाणीची"

वृषाली.."आकाशवाणी?दिव्य जन्म?"

सुप्रिया..."ताई ..कधी राजमहली येत जा... तिथे सगळ कळत...सगळ्या राज्यातील खबर मिळतात...गुप्तचरा मार्फत "

वृषाली..." तू आहे न माझी खबरगिर..."

सुप्रिया..(हसत)"हूम्ं...(उभी राहत)...ही द्रौपदी..महाराज दृपदच्या यज्ञवेदितून प्रकट झाली होती तिच्या भावा बरोबर ज्याचा जन्म गुरु द्रौन चा वध करण्यासाठी  झाला महणे ...(वळुन) त्याच्या जन्माच्या
वेळी हिच आकाशवाणी झाली. त्या नंतर एक कन्या त्या अग्नितून जन्मली तिच ही द्रौपदी...याज्ञसेनी ...तेव्हा आकाशातून पुण्या एक आवज आला..' ही कन्या समग्र शत्रियच्या विनाशचे कारण बनेल...हिच्या मूळे नविन धर्माची स्थापना होइल...'"
(आपले मोठे डोळे अधिक मोठे करित सुप्रिया सांगत  होती.)

वृषाली..."खरेच...(आश्चर्याने)"

सुप्रिया..."(विचार करित) देवच जाणे!!!"

Karn Draupadi - If They TalkМесто, где живут истории. Откройте их для себя