तूफान - Part 1

14.8K 35 2
                                    


" ओह गाॅड आज खूपच लेटच झाला. आता निघायला हवय." रचना तीच्या रिस्ट वाॅचमधे पाहात मनातल्या मनात म्हणाली.

ऊंबरगावच्या शासकिय दवाखान्यात तात्पूरत्या स्वरूपात सहा महीन्यांच्या कालावधीसाठी डाॅ.रचना प्रभारी वैद्यकिय अधिकारी म्हणून रूजू झाली होती. तशी ती शहरातल्या मोठ्या शासकिय रूग्नालयात डाॅक्टर म्हणून कार्यरत होती. "रूग्नसेवा हिच ईश्वरसेवा" हे ब्रीद अंगी बानवलेली रचना तीच्या कामामधे जीव ओतून कार्यरत असे ज्यामूळे तीला वेळेचा नेहमी विसर पडत आणि लेट होत. तीच्या कामातील तत्परता आणि प्रामाणिकपण ह्या गूणांमूळे वयाच्या तीशीत असलेली आणि एका गोंडस मूलीची आई असलेली डाॅ.रचना शहरातल्या रूग्णालयात सर्व स्टाफ आणि रूग्णांमधे आदरयूक्त व्यक्ती बनली होती. तिच्या आकर्षक व्यक्तीमत्वासोबतच चेहर्‍यावर विलसणारे आत्मविश्वासू हास्य समोरच्याला नेहमी आश्वस्थ करत असे. तीच्या प्रभावाने तीच्या सानिध्यात येणारा कोणीही व्यक्ती मूग्ध होत असे.

वैद्यकिय शिक्षण झाल्या झाल्या प्रशिक्षणार्थी म्हणून शासकिय रूग्णालयात रूजू होताना शहरातल्या प्रतिष्ठीत डाॅक्टर कूटूंबातल्या एकूलत्या एक मूलाचे रजतचे स्थळ तीला चालून आले. तीला खरेतर सध्या कामात झोकून द्यायचे होते पण डाॅक्टरच असलेल्या रजत आणि त्याच्या वडीलांनी तीच्या वैद्यकिय क्षेत्रात असलेल्या सेवाभावाबद्दल आदर ठेवत तीला लग्न ही गोष्ट कामाआड येणार नाही असे आश्वासन देऊन सून करून घेतली. तीच्या सासरकडचे खरेच सपोर्टीव्ह होते. डाॅ. रजत आणि त्याचे बाबा स्वतःचे हाॅस्पिटल चालवत होते पण त्यांनी रचनावर कधीही दबाव आणला नाही कि, तीनेपण घरच्या व्यवसायात हातभार लावावा. रजत तीच्यावर जीव ओवाळून टाकत होता. ती पण त्याच्यावर खूप प्रेम करत होती. लग्नानंतर तीला वर्षभरातच गार्गी झाली.

गार्गीची सर्व जबाबदारी रचनाच्या सासूबाईंनी आनंदाने स्विकारत लाडक्या सूनेला तीच्या करियरची वाट मोकळी करून दिली आणि अल्पावधीतच डाॅ.रचना रूग्णालयातल्या सर्व लोकांच्या गळ्यातली ताईत बनून लोकप्रिय झाली. गार्गीच्या जन्मानंतर गेली तीन वर्षे डाॅ. रचनाने कामात स्वत:ला झोकून दिले. तरिपण घरातली जबाबदारी सूध्दा काही प्रमाणात ऊचलत तीने सासू सासर्‍यांच्या मनातही विषेश जागा बनवली. तीचा स्वभाव मूळातच प्रेमळ आणी कनवाळू होता.

तूफानWhere stories live. Discover now