स्वैर- Part 1

12.9K 15 3
                                    

गतीमूळे निर्माण होणारा वारा तीच्या कानामागून तिचे भूरकट पण लांबलचक केस ऊडवत होता. त्या बेभान वार्याला मागे टाकायच्या ऊर्मीने ती चौदा वर्षांची नववीतली पोर आणखी जोरात पँडल मारत होती. अंगात शाळेचा गणवेश होता. ऊंच, गोरीपान, पौगंडावस्थेमधेच शरीरावर योग्यठिकाणी ऊतारचढाव आल्यामूळे तशी यूवतीसारखीच भासणारी पण मनाने अतिशय अवखळ आणि हूड. सर्व मूला मूलींना मागे टाकून पहीले तिला तीच्या आवडत्या जागी पोहोचायचे होते. तिचा गाव बर्यापैकी घाटमाथ्यावर होता. त्याच्या एका अंगाला नदी वाहात होती. तर एका अंगाला सह्यकड्याचा ऊतार होता. निसर्गाने मूक्तहस्ताने सौंदर्य बहाल केलेल्या त्या गावाला स्वराली सायकलने मागे टाकत चालली होती.

आज शनिवार होता. शाळा सकाळी होती. ती सूटल्यावर त्या सह्यकड्याच्या दिशेला आपोआप तीचे मन ओढ घेत असे. त्याठिकाणी पोहचून स्वतःशी संवाद साधण्याचा आणि स्वतःच्या मनात दडलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आखलेल्या योजनांचा मागोवा घ्यायला तीला आवडत असे. तीला वेगाचे व्यसन होते. "आयूष्य रोमांचकारी, गतिमान आणि वैविध्याने भरुन असेल तरच ते आयूष्य.." हे पण एक जगण्याचे तत्व आहे असे जाणन्याईतपत तिचे वय नसले तरी आयूष्य जगण्याची पध्दत अशीच होती. काळ तसा एवढापण जूना नव्हता. तरीपण गावाकडे अशा धूडघूस घालून रान ऊठवणार्या मूलींची संख्या विरळ होती. त्यांना भूवया ऊंचावून नंतर वाकडे तोंड करणार्यांची संख्या मात्र बरिच होती.

"स्वराली" गावातल्या पाटील घराण्याची पोर. तिच्या आधी एक आणि नंतर एक अशा त्या तीन बहीणी. पर्याच जणू. दृष्ट लागाव्या अशा. वडील गावचे पाटील असले तरी सन्माननिय शिक्षकही होते. त्यामूळे घरात तसा शिस्तीचा परिपाठ होता. मोठी आणि धाकटी वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हत्या पण स्वरालीचे तसे नव्हते. तीला स्वतःचे लाड करून घेणे येत होते.
डोक्याने चतूर स्वराली स्वतःची गोष्ट फार त्रागा करून न घेता मनवून घेत असे. दोन विरुद्ध गोष्टींचा किंवा मतप्रवाहांचा सुवर्णमध्य काढण्यात ती खूप पटाईत होती. तिच्या लाघवी व्यक्तिमत्वामुळे तिला सहसा कोणी नाकारण्याची वेळ तिच्यावर येत नव्हती. अशा स्वरालीचा मनप्रवास मात्र तिच्या विशिष्ठ लयीत चालू होता. तिच्या अंतरंगात डोकावून काय चालले आहे हे कोणालाही कळणे सहज शक्य नव्हते. ती एकलकोंडी मुळीच नव्हती. तिला माणसांची आवड होती. पण स्वतःला दिवसातला काही वेळ एकांत देण्यात तिला खूप छान वाटत असे. त्या एकांतात ती तिच्या स्वप्नील डोळ्यात उद्याची स्वप्ने पाहत असे. जसे कि तिला स्वतःमध्ये असे काय घडवता येईल ज्यामुळे ती अतिशय वेगळी दिसेल. ती स्वतःमध्ये असे बदल करू इच्छित होती कि ज्यामुळे ती सर्वांहून वेगळी पण तरीही सर्वाना धरून राहील. ती उच्चशृंखल अजिबात नव्हती. पण ती फार सोज्वळपणाच्या पठडीत बसेल अशीही नव्हती. स्वतःच्या सुंदर अस्तित्वाबद्दल तिला प्रेम होते. स्वतःवर इतरांपेक्षा किंचित जास्त प्रेम करणारी अशी स्वराली.

स्वैरWhere stories live. Discover now