WARNING- ADULT CONTENT
Chapter 1
" हुश्शश्स्श.." अंगावर गरम पाण्याचं उबदारपणा घेवून नेहाला थोडे तरतरीत झाल्यासारखे वाटलेनेहा नुकतीच कॉलेज मधून परत आली होती. दिवसभराचे रटाळ लेक्चर आणि मागील बाकावर बसून नुसतच वह्या वर रेघोट्या करत पूर्ण कॉलेज मध्ये वेळकाढू पणा करत नेहा घरी परतली होती. अंग क्षीण झाल्या मुळे शरीराला आंघोळीची नितांत गरज होती. अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर येवून ड्रेसिंग टेबलापाशी येवून स्वतः ला निहारु लागली.नेहाने टेबलावरील हेयर कंडीशन्सर ची बॉटल उचलून सर्व केसांना व्यवस्थित लावून घेतले. मग बॉडी लोशन तीन चार थेंब हातात घेवून हाताला आणि चेहऱ्याला मस्त पणे ओलावा करून घेतला.नेहा स्वतः च्या सुंदर जगात गुंग असताना तिच्या मोबाईल ने तिचे लक्ष वेधून घेतले. सहसा कॉलेज वा घरी असताना ती मोबाईल चा आवाज कमीच ठेवत असे. परंतु स्कुटी वरून घरी येताना आवाजाची मात्रा जास्तीत जास्त करत असे. बहूतेक घरी आल्यावर तो कमी करण्यास विसरली. सिनेमाच्या कर्कश गाण्याच्या आवाजाने ती शांत असलेल्या वातावरणात नक्कीच दचकली होती.बिछान्यावर मुक्तपणे वाजत असलेल्या मोबाईल च्या पडद्यावर वर ' बाबा ' असे नाव दिसले.
हेलो बाबा " मोबाइल उचलताच नेहा म्हणली"हेलो नेहा बाळा ...काय चाललय ..सर्व ठीक आहे ना ? " ..बाबांनी प्रेमाने नेहाची विचारपूस केली."
काही नाही बाबा ..आताच कॉलेज मधून आली आहे ..फ्रेश होवून आराम करत आहे. नेहा उत्तरली."
आम्ही आत्ताच चंदीगड विमानतळा उतरलो आहे...मनाली जाण्यासाठी टँक्सी येईल आता .. नेहाचे बाबा म्हणाले.
""ओह... गुड ..कसा झाला प्रवास " नेहाने विचारले.
" अरे ठीक ठाक झाला ..विमान टेक ऑफ करताना थोडेसे हलले ..आणि लँड करताना थोडेसे हलले...दरम्यान प्रवास करतो असे वाटलेच नाही. बाबानी तुटक शब्दात बोलले.