मैत्रिण माझी लाडाची - 1

3.7K 10 3
                                    

• मैत्रिण माझी लाडाची - भाग 01 •

~ मुख्य पात्रे ~

.. अलिशा.. सेलेना.. रॉन.. हॅरी ..

Hey.. Alisha.... अलिशाsss.... slow down please.. ए.. माझ्यासाठी थांब ना... don't run so fast.... सेलेना काहीशी ओरडतच अलिशाच्या पाठीमागुन पळत होती.

सेलेनाही न थांबता अगदी वेगात पळतच म्हणाली.

I'll reach there before you babe.. haha

तुझ्या आधी पोहोचते बघ मी.. लाव पैज..

दोघीही नागमोडी वळणांवरुन पायातील पालापाचोळ्याला तुडवत गच्च झाडीतुन अगदी मुक्त असल्यासारख्या सुसाट पळत होत्या.. आजुबाजुच्या झाडांना मागे टाकत जसा जसा समुद्रकिनारा जवळ येऊ लागला त्यांनी किना-याकडे पळण्याचा आपला वेगसुद्धा आणखी वाढवला. दोघींच्या हसण्याचा तो मधुर आवाज निसर्गाला भुरळ पाडु लागला. त्या भल्यामोठ्या आणि लांबलचक समुद्र किना-यावर पोहोचताच दोघींनी बूट चप्पल वाळुमध्ये टाकत आपापला फ्रॉक पायातुन खाली सरकवतच धावण्याचा वेग कंट्रोल केला आणि बघता बघता त्यांच्याच दिशेने येणा-या लाटेत स्वत:ला सामावुन घेत स्वार झाल्या.

जणु काही तो भव्य निळा समुद्र देखील रोजच्यासारखी त्यांचीच वाट पाहत होता आणि त्यांना पाहिल्यावर त्याने दोघांसाठी एकामागोमाग एक मदमस्तपणे हिंदकळत येणारी लाट सोडली होती. एकानंतर एक लाटा पोहुन पार करत दोघी समुदात जवळच असलेल्या टेकडीवर उतरल्या. ती जागा त्यांनी स्वत:साठी कायमस्वरुपी रिझर्व केली होती. टेकडीवरच खणलेल्या एका लहान खड्ड्यात ठेवलेल्या कातडी पिशवीत दोघींनी त्यांचा खजिना लपवलेला होता. घरातुन चोरलेल्या वाईन ने भरलेल्या काचेच्या लहान गोलाकृती बाटल्या अलिशा ने बाहेर काढल्या. त्यातली एक रेड वाईनची बॉटल तोंडाला लावत दुसरी तिने सेलेनाच्या हातात दिली.

अलिशा... डॉल्फिन्सssss .. डॉल्फिन्स आले बघ..

सेलेना आरोळी ठोकत म्हणाली..

दोघी वाईनचा स्वाद घेत डॉल्फिन्सच्या वर खाली होत पोहत जाणा-या आकृतींना पाहत थंडगार पाण्यात पाय सोडून बसल्या. दोघींच्या नाजुक गालांना पडत असलेल्या खळींना स्पर्श करत हळुवार वाहणा-या हवेचा आनंद घेत त्या तिथेच मस्तपैकी आडव्या झाल्या.

मैत्रिण माझी लाडाचीWhere stories live. Discover now